जिनींग मशीनच्या अपघातात महिलेला मृत्यु – मालकावर गुन्हा दाखल

0
1227
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
     जिनींग मशीनचा पट्टा तुटुन झालेल्या अपघातामध्ये एका महिलेला मृत्यु झाल्याची घटना शहरात नुकतीच घडली.
      प्राप्तमाहितीनुसार,  शहरातील कुऱ्हा रोड स्थित पनपालीया यांची कापसाची जिनींग आहे. या जिनींगमध्ये रात्रीच्यावेळी मशीनवर काम करीत असतांना मशीनचा पट्टा तुटुन झालेल्या अपघातात महिला मजुर लताबाई कदम (चांदूर रेल्वे) यांचा मृत्यु झाला. या अपघातात सदर महिला मशिनमध्ये ओढविल्या गेल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची तक्रार मृतकाचा पुत्र गजानन याने चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला नोंदविली. यामध्ये त्याने सांगितले की, जिनींग मध्ये आई काम करीत असतांना मालक नरेश पनपालीया हे मशीन सुरू करून चालले गेले. त्यानंतर झालेल्या अपघातात लता कदम गंभीर जखमी झाल्या होत्या व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. पोलीसांनी जिनींग मालक नरेश पनपालीया यांच्याविरूध्द कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.