शहापुर येथे पालकमंञी डॉ. रणजीत पाटील यांच्यासह भुमीचे महाश्रमदान @Ranjitpatil_Mos

0
726
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके –

वाॕटरकप स्पर्धेअंतर्गत काल दि.1मे रोजी ठीकठीकाणी महाश्रमदान पार पडले.आकोट तालुक्यातील दुर्गम आदीवासी शहापुर या गावात महाश्रमदानाची आखणी करण्यात आली होती.याठीकाणी जलसंधारणासाठी शहापुरात पालकमंञी डॉ. रणजीत पाटील यांच्यासह भुमी फाउंडेशनचे श्रमदानासाठी तुफान आले होते.उन्हाचा पारा 45° च्या आसपास असतांनाही दुपारी भर उन्हात भुमी फाउंडेशनचे तुफान पाणी चळवळीसाठी शहापुरात दाखल झाले होते.

दरम्यान या महाश्रमदानाला अकोला जिल्ह्याचे पालकमंञी डॉ. रणजीत पाटील यांनी शहापुरला पोहचत श्रमदान करत गावकऱ्यांचा व श्रमदान करणाऱ्यांचा उत्साह वाढवला.डॉ पाटील शहापुरात पोहचताच गावकऱ्यांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत केले,महीलांनी औक्षण केले.यावेळी पालकमंञ्यांनी श्रमदान करणाऱ्यांची आस्थेनं चौकशी करत त्यांच्या कार्याचं कौतुक केले.यानंतर श्रमदानस्थळी जलजागर सभा पार पडली.सभेला पालकमंञी डॉ.रणजीत पाटील ,भुमी फाउंडेशनचे अध्यक्ष तुषार अढाऊ ,सचिव चंचल पीतांबरवाले,डॉ अशोक ओळंबे,उप. विभागीय अधीकारी उदयसिंह राजपुत,तहसिलदार विश्वनाथ घुगे,योगेश नाठे ,डॉ.लांडे,दिलीप बोचे यांची मंचावर उपस्थीती होती.यावेळी डॉ रणजीत पाटील यांनी गावकऱ्यांच्या श्रमदानास शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या मनोगतात जल चळवळीसाठी उन्हातान्हाची पर्वा न करता कार्य करणाऱ्या भुमीच्या टीमचे विशेष कौतुक केले.व सकारात्मक कार्य करणारी खरी तरुणाई म्हणजे भुमी फाऊंडेशन असल्याचे गौरवोद्गार काढले भुमीच्या या महाश्रमदानात तुषार अढाऊ,चंचल पीतांबरवाले ,पञकार संतोष विणके ,प्रिती धुमाळे,सुनिल मस्करे ,कमलेश राठी,आकाश धुमाळे,अझहर ,पंकज अंबुलकर,आणी ऋत्विक शेळके आदींनी सहभाग घेतला होता.