५ मे पासुन ‘मस्ती की पाठशाला’ उन्हाळी शिबीर

0
743
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान . )
       शालेय परिक्षांच्या तणावातुन मुक्त झाल्यानंतर उन्हाळ्याच्या हक्काच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांकरिता धमाल मस्ती सोबतच व्यक्तीमत्व विकास घडवून आणणाऱ्या ‘मस्ती की पाठशाला’ या उन्हाळी शिबीराचे ५ मे पासुन साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये अमरावती जिल्हा कुराश स्पोर्ट असोसिएशन यांचाही सहभाग असणार आहे.
       ५ मे ते २५ मेपर्यंत शहरातील हुतात्मा स्मारक येथे आयोजित या शिबीरात नृत्य, स्टेज डेअरींग, नाटक, माईम, स्कीट, गीत गायण, फॅशन शो, हस्तकला, कॅमेरा फेसिंग फोटोग्राफी, चित्रकला, डाक्युमेंट्री फिल्म, सेल्फ डिफेंस आदींचा समावेश असणार आहे. शिबीरामध्ये मार्गदर्शक म्हणुन विराग जाखर, विशाल तराड, हर्षद ससाणे, दिपक नांदगावकर, संतिप देशमुख, सुमेर सरदार, राजु शिवणकर, विवेक राऊत, दिपक बन्सोड, राहुल जगताप, डॉ. रितेश विश्वकर्मा, देवेंद्र मेश्राम आदींची उपस्थिती राहणार आहे. तरी या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन शिबीर प्रमुख चेतन भोले, संचालक सचिन उईके, सुरज भोयर, वैभव पाटणे आदींनी केले आहे.