अ.भा. ग्रामिण पत्रकार संघटनेची जिल्हास्तरीय बैठक संपन्न

0
921
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
        अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघटना संपुर्ण महाराष्ट्रात आगेकूच करित असून सगळीकडे मोठ्या प्रमाणात संघटनेला बळकटी मिळत आहे. अशातच चांदूर रेल्वे शहरात अ.भा. ग्रामिण पत्रकार संघटनेची जिल्हास्तरीय बैठक नुकतीच पार पडली.
        या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने हे होते तर विशेष अतिथी म्हणुन केंद्रीय कार्याध्यक्ष मधूसुधन कुलथे, केंद्रिय सरचिटणीस सुरेश सवळे , केंद्रीय चिटणीस अशोक पवार , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय सदस्य वसंतराव कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदेश महासचिव अशोक राठी, केंद्रीय सदस्य व प्रदेश सल्लागार राजेन्द्र भूरे, केंद्रीय नियोजन समिती अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे, केंद्रीय सदस्य युसुफ खान, केंद्रीय सदस्य व विदर्भ सहसंघटक पवन बैस, अशोक याऊल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक युसुफ खान यांनी केले. प्रास्ताविकानंतर दिवसेंदिवस पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारांना अधिस्विकृती कशी मिळेल यावर चर्चा तसेच पत्रकारांच्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकून मनोहरराव सूने, मधूसुधन कुलथे, कैलासबापू देशमुख यांनी तालुक्यासह जिल्ह्यातील उपस्थित पत्रकारांना अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच पत्रकारभवनाची उभारणी करण्याकरिता येणाऱ्या समस्यांबाबत उपाययोजना करण्याची सुध्दा माहिती दिली.
           या पार पडलेल्या बैठकीला राजु भाष्करे, राहूल उके, अब्दुल सत्तार, आकाश जयस्वाल, अमित जोशी, श्री. उटाळे, आशिष पांडे, प्रविण फुसाटे, सुरज दहाट, जानराव मनोहर, सचिन ढोके, नौशाद पठान, चांदूर रेल्वे तालुकाध्यक्ष गुड्डु उर्फ प्रविण शर्मा, उत्तमराव गावंडे, प्रभाकरराव भगोले, बाळासाहेब सोरगिवकर, प्रा. रविंद्र मेंढे, अमोल गवळी, संजय मोटवानी, अभिजीत तिवारी, इरफान पठान, विवेक राऊत, मंगेश बोबडे, विनय गोटफोडे, धिरज नेवारे, मनिष खूने, राजेश सराफी, शहेजाद खान, अमर घटारे यांसह अनेक पत्रकार बंधूंची प्रामुख्याने उपस्थित होती. कार्यक्रमाचे संचलन बाळासाहेब सोरगिवकर यांनी तर आभार प्रदर्शन अमोल गवळी यांनी मानले.