मुस्लिम समाजातील लग्नात नवरदेव व नवरीने वृक्षारोपण करून घडविला आदर्श

198

आकोट :- संतोष विणके –

शासन सर्वत्र झाडे लावा झाडे जगवाची मोहीम राबवत आहे तसेच अनेक गावं पाण्यासाठी कार्य करित आहेत त्यातच अकोट शहरातील भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा उपाध्य्क्ष अहेमद खान यांचा लहान भाऊ नवरदेव ज़ुबेर खान रियाज़ुल्ला खान यांचा शुभ विवाह हिवरखेड येथे पार पडला .मुस्लिम समाजात लग्नामध्ये लोक अनेक भेटवस्तु देतात मात्र अकोट मधील जावेद अली मिरसाहेब व सय्यद अहेमद यांनी नवरदेवाला लग्न प्रसंगी वृक्ष भेट देऊन नवरदेव व नवरी सोबत हिवरखेड मौलाना अबुल आज़ाद उर्दू शाळेत लग्नानंतर लगेच वृक्षरोपण केले व शाळेचे मुख्याध्यापक फ़िरोज़ अली यांनी अशी गवाही दिली की या वृक्षाचे संगोपण व पाणी टाकण्याचे जबाबदारी शाळेतील मुले घेतील. पहिल्यांदा मुस्लिम समाजात एक अगळा वेगळा उपक्रम राबवून चांगला संदेश निर्माण केला त्यामुळे समाजात खरोखरच हे उपक्रम समाजात प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांचा सर्व स्तरावरून भरभरुन कौतुक करून पुढच्या प्रोत्साहन देण्यासाठी शुभेच्छा दिल्या या उपक्रम बद्दल अचानक लोकांना पाहुन खरच पण हे आपली जबाबदारी असून आपण करणार असल्याचे लोकांनी आपले भावना व्यक्त केले पाहिल्यान्दा मुस्लिम समाजातील लग्न प्रसंगात हा अगळा वेगळा कार्यक्रम राबवून समाजामध्ये जनजागृती करिता चांगला जावा आणि प्रत्येक लग्नात वृक्ष भेट देवून समाजात एक आदर्श निर्माण करण्याचा संकल्प हाती घेवून स्वतच्या खर्चाने कुठल्याही समाजाच्या लग्नात स्वतःहून वृक्ष भेट देणार यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल या मोहीम साठी अकोट येथील हरिबापा सेवा समितीचे अध्य्क्ष बाबाभाई सेजपाल यांनी सुध्दा सर्व प्रथम उपक्रम बद्दल कौतुक करून या मोहिमेस सहभागी होवून मदत करण्याचे आवाहन केले हे वृक्षरोपण जात पात न पाहता प्रत्येक समाजाच्या लग्न कार्यात व वाढदीवसात केल्या जाईल यावेळी शाळेचे संस्थापक अध्य्क्ष शोहेब अली मिरसाहेब हिवरखेड चे माजी सरपंच सादिक भाई हिवरखेड चे उपसरपंच डॉ शकील अली मिरसाहेब भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष शेरुद्दीन पंचगव्हाणकर जिल्हा उपाध्य्क्ष अहेमद खान नासीर खान भुरु भाई नाजिम खान साजिद खान ज़ुबेर सर परवेज काझी यांचे सह नवरदेव व नवरीचे सहकारी व परिवारातील मंडळी व वरातीतील पाहुणे उपस्थित होते.हे सामाजिक कार्यात सतत तत्पर राहणार अशी गवाही मान्यवरांनी दिली .

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।