काजळी येथे 8 वर्षांपासून पाण्याची चोरी

Google search engine
Google search engine

👉🏻ग्रामपंचायत सदस्य च्या नातेवाईक कडून पाण्याची चोरी

👉🏻काजळी ग्रामपंचायत मधील प्रकार

चांदुर बाजार:-

आपण एक जबाबदारी च्या पदी आहे.त्याचा दुरुपयोग न होता चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग व्हावा.अशी प्रत्येक जबाबदारी व्यक्ती ची कर्तव्य असतात.मात्र राजकीय हितसंबंध लक्ष्यात घेऊन काजळी येथील तंटामुक्ती अध्यक्ष ,आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या नातेवाईक कडून अवैध नळ कनेक्शन घेऊन मागील 8-9 वर्षांपासून पाण्याची चोरी केली असून यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी अशी तक्रार काजळी येथील गावकरी यांनी पंचायत समिती आणि काजळी ग्रामपंचायत सचिव यांच्या कडे केली आहे.

डोरली विनोद सुने हे काजळी ग्रामपंचायत मधील वार्ड क्रमांक 3 मधील सदस्य म्हणून प्रतिनिधित्व करीत आहे तर गावातील तंटामुक्ती समिती अध्यक्ष अरुण श्रीराम सुने हे आहे.यांचे नातेवाईक श्रीरामजी सुने यांनी आपल्या शेतातील वाडी मधील गावातील पाण्याच्या टाकीवरून नळ कनेक्शन घेतले.मात्र त्याची कोठल्या प्रकारची नोंद काजळी च्या ग्रामपंचायत दप्तरी नाही.हा प्रकार जेव्हा उघडीस आला.जेव्हा मार्च महिन्यात पाण्याची सक्ती वसुली आणि अवैध नळ कनेक्शन काढणे चालू होते.

आपले पितळ उघडे होणार हे माहिती होताच.श्रीरामजी सुने यांनी आपला नळ आताच घेतला असून त्याची नोंद करण्यात यावी संबधी चा अर्ज काजळी ग्रामपंचायत मध्ये केला.मात्र सत्य परिस्थिती लपविण्यात आल्याने काजळी येथील ग्रामपंचायत सदस्य अरविंद कपले यांनी 2 मासिक सभेमध्ये मध्ये कनेक्शन अवैध असल्याचे सांगितले.मात्र तरी देखील ग्रामपंचायत सदस्य असल्याने सचिव यांच्या सोबत संगनमत करून त्या नळाची रेकॉड वर नोंद करण्यात आली.मात्र यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी काजळी कर करीत आहे तरी पदाचा दुरुपयोग करून मनमानी करणारे वर कार्यवाही होणार का ही पुन्हा पदाचा दुरुपयोग केला जाईल याची वाट काजळीकर पाहत आहे.तर गावातील सामान्य नागरिक यांच्या करिता वेगळा नियम आणि सदस्य यांच्या करीता वेगळे नियम असे चित्र दिसत आहे.तसेच काजळी मधील अनेक वर्षे पासून अवैध नळ कनेक्शन धारक आहे यांच्यावर कार्यवाही कोण करणार हा चांगला विषय रंगात आहे.
*—————————————–*
प्रतिक्रिया:-
मागील 8 ते 9 वर्षे पासून तो नळ अवैध आहे.त्याची पाण्याची चोरी केली आहे.कार्यवाही करण्यात यावी. पदाचा दुरुपयोग फक्त आपल्या स्वार्थीपणासाठी घेणे योग्य नाही.
विजय निचत तक्रार कर्ते
*—————————————-*
या प्रकरणाची सत्यता मी मागील 2 मासिक सभे मध्ये लक्ष्यात आणून दिले होते.तरी देखील यांनी तो नळ रेकॉर्ड वर लावला त्यामुळे ग्रामपंचायत याला पाठबळ देत असल्याचे दिसत आहे.
अरविंद कपले ग्रामपंचायत सदस्य

*—————————————-*

त्यांनी अर्ज दिला त्यावरून आम्ही तो नळ रेकॉड वर लावला आहे.
शारदा चौधरी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी काजळी
*——————-/-/———— *
दिनांक 5 मे ला चौकशी करीता काजळी ग्रामपंचायत मध्ये गेलो असता चौकशी ला सुरुवात केली आहे.चौकशी करून लवकरच अहवाल देऊ.

हनुमान सिडाम विस्तार अधिकारी पंचायत समिती चांदुर बाजार
*—————————————–*

*बॉक्स*
तक्रार झाल्यानंतर तब्बल 1 महिण्याचा कालावधी ओलाढल्या नंतर चौकशी सुरू करण्यात आली आहे.त्यामुळे अधिकारी यांच्या हाती काही लागणार की नाही ही संशय निर्माण करणारी बाब आहे.