रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त अकोट शहर वाहतूक पोलिसांचे विविध उपक्रम

0
817

अकोटः-प्रतीनीधी –

रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत शहर पोलिसांनी विविध उपक्रम राबुवुन वाहतुक सुरक्षे बाबत जनजागृती केली.या रस्ता सुरक्षा सप्ताहाला शहर पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शन लाभले.रस्ता सुरक्षा सप्ताह ,अंतर्गत सुरक्षित वाहन चालविण्या संबंधी कॉम्पुटर क्लास मधून मार्गदर्शन करण्यात आले तसेच , रस्ता सुरक्षा जनजागृती बाबत शहरात होर्डिंगस व बॅनर लावण्यात आले, वाहतूक नियमांची माहिती जनतेला व्हावी म्हणून वाहतूक नियमांचा अंतर्भाव असलेली पत्रके देखील वाटण्यात आली, दरम्यान रस्त्याने जात असलेल्या नवरदेव व त्याचे वऱ्हाड ह्यांना सुद्धा वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल अशी माहीती पत्रके वाटण्यात आली .

तसेच विविध प्रकारच्या १००० हजाराहुन जास्त वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले, रस्ता सुरक्षा बाबतची ही मोहीम 7 दिवस अकोट शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली अकोट शहर वाहतूक शाखेचे जगदीप ठाकूर, अनिल लापूरकर, गणेश फोकमारे, सिरसाट ह्यांनी राबविली.मोहीमे दरम्यान भुमी फाऊंडेशन ,वाॕक ए थॉन,जेसीआय ,शेतकरी मोटर्ससह नागरीक तथा वाहचालकांचा उत्स्फुर्त प्रतीसाद मिळाला.