प्रशासकीय गतिमानता अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न

215

लातूरच्या सलीम पठाण यांचा सत्कार

 नितीन एस ढाकणे 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत प्रशासकीय गतिमानता अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबविली गेले. या अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील सात केंद्र संचालकांचा नुकताच नागपूर येथे कामगार कल्याण आयुक्त सतीश दाभाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.

औरंगाबाद विभागातून सलीम पठाण यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार झाला.

या सत्कार सोहळ्यास  सहाय्यक कल्याण आयुक्त घनश्याम कुळमेथे,  नंदलाल राठोड, माधवी सुर्वे, भावना बच्छाव, श्रीकांत धोत्रे, भालचंद्र जगदाळे, अरूण कापसे  यांच्यासह कामगार कल्याण अधिकारी मनोज पाटील, कुंदन खेडकर, समाधान भोसले, सयाजी पाटील, संतोष साबळे, विजय शिंगाडे, जितेंद्र पाटील यांची उपस्थिती होती. प्रशासकीय गतिमानता अभियानात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल अनिल लोखंडे, गजेंद्र आहिर, आर. एस. शेख, संघसेन  जगतकर, आनंता  मोरे,  सलीम पठाण यांचा स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

फोटो क्यापशन…. प्रशासकीय गतिमानता अभियानात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करतांना कामगार आयुक्त सतिश दाभाडे.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।