अन् भाजप नगरसेवकांनी लोकवर्गनीतून बसविले गटरवरील झाकण – सत्ताधारी व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप

0
696
Google search engine
Google search engine

गटनेता संजय मोटवानी यांचा पुढाकार

 

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
      शहरातील एका गटरवर झाकण नसल्याची बाब नागरीकांनी नगराध्यक्ष, सत्ताधारी नगरसेवक व प्रशासनाला लक्षात आणून दिल्यानंतरही दुर्लक्ष केल्यामुळे भाजपा नगरसेवकांनी लोकवर्गनीतुन अखेर या गटरावर मंगळवारी झाकण बसविले. यासाठी भाजपा गटनेता संजय मोटवानी यांनी पुढाकार घेतला.
        चांदूर रेल्वे शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या ढोले डॉस्पीटलच्या बाजुला कविता मेडीकल असून या समोरून गटर गेला आहे. या गटरमधील साफसफाई करीत थोडी जागा उघडी सोडण्यात आली असून त्यावर झाकण बसविणे गरजेचे आहे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षापासून या गटरवर झाकण बसविण्यात आले नव्हते. त्यामुळे येथून ये-जा करणारे अनेक नागरीक यामध्ये पडले असून काहींना इजा सुध्दा झाली आहे. सदर बाब नागरीकांनी तसेच भाजपा नगरसेवकांनी नगराध्यक्ष, काही सत्ताधारी नगरसेवक तथा मुख्याधिकाऱ्यांना अनेक वेळा लक्षात आणून दिली. परंतु त्यांनी प्रत्येकवेळेस दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना झाकण बसविणे गरजेचे वाटत नसतांना आम्ही लोकवर्गनीतून झाकण बसविल्याचे भाजपा नगरसेवकांनी सांगितले. सत्ताधारी व प्रशासन मुख्य असलेल्या लहान – लहान गोष्टींकडे सुध्दा लक्ष देत नसल्यामुळे ही एक शरमेची बाब असल्याचेही मत यावेळी व्यक्त केले. झाकण बसवितेवेळी गटनेता संजय मोटवानी, नगरसेवक अजय हजारे, विलास तांडेकर, कविता मेडिकल्सचे संचालक महेश भुत यांसह अनेक नागरीक उपस्थित होते.