पाटील परिवारातील नवरदेव-नवरीची वरात दमणीतुन

0
1682

शेगाव : ‘चल रे राजा चल रे सर्जा
बिगी बिगी वाट वाकडी दाट झाडाची, चालली गाडी घुंगराची!
वाट लागली डोंगराची, गाडी चालली घुंगराची         घुंगराचा खळखळाट करत पहाटेच्या प्रहारी शेत शिवारा ची पाऊलवाट पकडणारी  बैलगाडी आज एकविसाव्या शतकातही चालू आहे. नवनवीन, अत्याधुनिक वाहनांची भर पडत असताना जुन्या संस्कृतीची प्रतीक असलेली बैलगाडी आणि दमणी  नामशेष होईल की काय अशी भीती होती. पण ‘जुने ते सोने’ या म्हणीप्रमाणे ही दमणी आणि बैलगाडी आजही टिकून असल्याचे शेगावात नवरदेवासाठी  शहर प्रदक्षिणा करिता खास वापर झाल्याने दिसून येत आहे.
> >                  शेगावात नुकतेच बुलढाणा जिल्हातील प्रथम राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शीक्षक स्व वा.ओ.पाटील यांचा नातू कुश्ण्रराव उर्फ प्रकाश पाटील यांचे चिरंजीव रविराज पाटील मोदी नगर शेगाव हे उच्च विद्या विभूषित असून पं.स.माजी सभापती सुरेश शेळके यांची कन्या रानी यांचा विवाह 30 एपरील ला दोन दिवसापूर्वीच झाला असून मोठमोठया  21व्या शतकातील गाड्या असून सुद्दा ४० वर्षांच्या आदीच्या काळातील  जुन्या पारंपरिक पद्दतीचा वापर  करीत राऊत (पाटील )व शेळके परिवाराने वरात ही घुंगरवाली दमाणी तून काढली आहे याची चर्चा संपूर्ण पंचकोर्शीतील परिसरात रंगत आहे.        खेडेगावातील महिला व बाळगोपाळ आजही बैलगाडीतून आमरस खायला मामाच्या गावाला किंवा तालुक्याच्या ठिकाणी बाजाराला जाताना दिसतात. पंचवीस वर्षांपूर्वी मामाच्या गावाला किंवा लग्नाचे वऱ्हाड, शेतात गव्हाच्या ओंब्या, ज्वारीचा हुरडा खाण्यासाठी दमणी आणि बैलगाडीतून सफर करणे म्हणजे मजा असे. रंगीबिरंगी झुली बैलांच्या अंगावर असत, त्यांच्या गळ्यातील घुंगरांच्या माळा खुळखुळत आणि गाडी हाकताना मालक मोठय़ा झोकात गाणे म्हण असे किंवा बैलांना दामटी. पाणंदीतून, काटय़ा झुडुपातून, दगड धोंडय़ातून ही दोन बैलांची गाडी वाट घुंगराच्या नादात काढीत असे.
> >        नव्या युगातील वाहनांना पेट्रोल-डिझेल, वीज असे काही तरी इंधन लागते. पेट्रोलियमचे साठे किती दिवस पुरणार आहेत, असे आजच विचारले जाते. बैलगाडीला महिन्याकाठी थोडेसे वंगण आणि बैलांची वैरण एवढय़ावरच सर्व शेती कामे केली होतात. परंतु आज पर्याय म्हणून ट्रॅक्टर उभे राहिल्याने बैलगाडीवर गंडांतर ठरते की काय असे वाटत होते. परंतु केवळ सधन शेतकरी सोडता आजही ५५ टक्के शेतकऱ्यांकडे बैलगाडीचा वापर होताना दिसतो. लाकडापासून बनविण्यात येणाऱ्या बैलगाडय़ा, ‘दमणी व मालवाहू बैलगाडी’ अशा दोन प्रकारांत तयार केल्या जात होत्या. दमणी बैलगाडी केवळ गावाला जाण्यासाठी वापरली जायची. वजनाने हलक्या असलेल्या या बैलगाडीत तीन-चार माणसे बसण्याची व्यवस्था असायची. त्यांच्यावर ऊन, पाऊस लागणार नाही यासाठी वरून कमानीच्या आकाराचा कापडी पडदा लावलेला असायचा. गाडीतून लग्नाची वऱ्हाडी मंडळी दुसऱ्या गावी जायची तेव्हा पाच-पंचवीस दमन्या गाडय़ांचा ताफा एकामागून एक रांगेत निघे. ते दृश्य मोठे मजेशीर दिसे.
> > दमणी गाडय़ा बनविण्यासाठी देवदार, सागवान लाकूड वापरून गाडीच्या जुवू व साठय़ावर बारीक नक्षी काढली जायची. ती काळ्या तेलाने चकचकीत केली जाईल. त्यामुळे दमणी मोठी रुबाबदार दिसे. आजही ग्रामीण भागात बैलगाडीच वापरली जाते.  नवी पिढी ही मामाच्या गावाला किंवा ग्रामीण भागात गेली तर बैलगाडीत बसायला विसरत नाही. अशी हि दमणी आज कालबाह्य होते कि काय असे वाटत असतांना शेगांव मध्ये. दमणीतुन काढलेली वरात मोदीनगर मध्ये येताच सुवस्नीनी त्यांचे स्वागत करीत अओष्न केले व फटयाक्याची आतिश बाजी करण्या आली हा चर्चेचा विषय होत आहे.