हिंदू ओबीसी सह मुस्लिम ओबीसी समाजाचा विकास करणार – शब्बीर अंसारी >< ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन कार्यक्रमात प्रतिपादन

0
868
Google search engine
Google search engine

 मुस्लिम समाजाची चिंता – डॉ. भालचंद्र मुगणेकर




मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) हिंदू ओबीसी समाजात मोठ्या प्रमाणावर मला मानणारा वर्ग आहे गेली 42 वर्ष मुस्लिम ओबीसी साठी काम करत आहे आता हिंदू ओबीसी समाजाचा विकास करत मुस्लिम ओबीसी चा विकास करणार असल्याचे प्रतिपादन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अंसारी यांनी इस्लाम जिमखाना येथे संघटना बांधणी कार्यक्रमात केले.

अंसारी म्हणाले की, हिंदू ओबीसी समाजात राज्यात मला मानणारा मोठ्या प्रमाणावर वर्ग आहे. आज मुस्लिम ओबीसी समाजाचा विकास गेली 42 वर्षे करत आहे. त्यात आम्ही अनेक वेळा तुरुंगात गेलो. पण इतर काही लोक ओबीसी नेते झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, खा. शरद पवार, माधवराव शिंदे, मंत्री अर्जुन खोतकर, अॅड. प्रकाश आंबेडकर आदी नेत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तर काही नेत्यांची कान उघडणी केली. तसेच आज संघटना गेली 42 वर्ष कार्यरत आहे. काही वर्ष पूर्वी काँग्रेस ला समर्थन पाठींबा दिला होता त्यामुळे आम्ही मागितलेल्या जागा निवडून आणल्या त्यात आमचे 03 आमदार होते. याच पाश्वभूमीवर संघटना बांधणी करून मुंबईत संघटना बळकट करत असल्याचे सांगितले. माजी खासदार डॉ. भालचंद्र मुगणेकर म्हणाले की, देशाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. गौतम बुद्ध, जीजस, आदी थोर महापुरुषांचे वाचन केले आहे. मुस्लिम समजाची मला चिंता आहे. दलित, आदिवासी समाजाप्रमाणे मुस्लिम समाज गरीब आहे. असे मुगणेकर यांनी सांगितले. दरम्यान संघटना बांधणी करताना मुंबई अध्यक्ष निजामुद्दीन राईन, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी मोमूद अंसारी, राज्याचे जनरल सेक्रेटरी डॉ. खुर्शीद सिध्दीकी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सिकंदर शाह यांची नियुक्ती करून पदे बहाल करण्यात आले.

यावेळी मौलाना सय्यद मोइनुद्दिन अशरफ उर्फ मोईन मिया, युसुफ अब्राहाबी, सोयल लोखंडवाला, सोयल खांडवाणी, नसीम सिद्धीकी, सर्फराज आरजू, अॅड. जलालुद्दीन, राष्ट्रीय युवा अध्यक्ष गुफरान अंसारी, राज्याचे सचिव शाहरुख मुलाणी आदी उपस्थित होते.