महाराष्ट्रात येणाऱ्या गुटख्यावर निर्बंध लावा -शिवसेना उपशहरप्रमुखांचे एमपी पोलीसांना निवेदन

0
812
Google search engine
Google search engine

अमरावती-महाराष्ट्रात गुटखा बंदी असतांना शेजारिल राज्य मध्यप्रदेशातून मोठ्याप्रमाणात अवैध गुटख्याची तस्करी महाराष्ट्रात होत आहे. परंतु या दोन राज्यांच्या सीमेवरच जर या गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळल्या तर हा गुटखा महाराष्ट्रात येणार नाही. त्यामुळे एमपी (मध्यप्रदेेश)पोलीसांनी सीमेवरच या तस्करांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी अमरावती शिवसेना उपशहरप्रमुख आशिष ठाकरे यांनी थोड्या दिवस अगोदर केली आहे. त्यांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेले देडतलाई पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना एका निवेदना द्वारे ही मागणी केली.
परराज्यातून येणा:या अवैध वस्तु एकदा राज्यात आल्या की, छुप्या मार्गाने सर्व राज्यात तस्करी करण्याचे मार्ग अनेक आहेत. त्यामुळे ही तस्करी पोलीसांच्याही अवाक्याबाहेर जाते. मात्र धारणी पोलीस व देडतलाई पोलीसांनी योग्य समन्वय ठेवला तर महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात किंवा मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात होणारी अवैध तस्करी थांबविण्यास मोठी मदत होईल. याकरिता ठाकरे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने देडतलाईचे पोलीस निरीक्षक श्री प्रतापसिंग भदोरीया यांना निवेदन देवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. मध्यप्रदेशातील सिमेलगदची १८ गावे त्यांच्या कार्यक्षेत्रात येतात त्यांनी यावेळी तस्करांवर निर्बंध लावण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.