राम नगरात वळणावरील रस्ता झाला केवळ ५ फुटांचा – वाहनधारकांना सहन करावा लागत आहे त्रास

0
587
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
      बीएसएनएल ऑफीसजवळून राम नगरमध्ये गेलेला रस्ता वळणावर केवळ अंदाजे ४-५ फुटांचा झाला असुन वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
      शहरातील राम नगर परीसरात बजाज शोरूम असुन या समोरील मोठा रस्ता वळणावर केवळ ४-५ फुटांचा झाला आहे. सदर वळणावरून चार चाकी वाहन तर दुरचीच गोष्ट असुन दोन दुचाकी सुध्दा क्रॉस होणे अशक्य झाले आहेत. वळणावरील रस्त्यावर एका नागरीकाने माती टाकुन अतिक्रमण केले असुन दुसऱ्या बाजुने झाडेझुडपे आहेत. परंतु माती टाकलेली जागा सदर व्यक्तीची स्वत:चीच असुन त्याठिकाणी नगर परीषदव्दारा डांबरी रस्ता बनवून अतिक्रमण केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे नेमके अतिक्रमण नागरीकाने केले आहे की नगर परीषदने केले आहे ? हा एक संशोधणाचा विषय बनला आहे. असे असले तरी नगर परीषदने तातडीने याबाबत ठोस निर्णय घेऊन वाहनधारकांना होणाऱ्या त्रासापासुन मुक्त करावे अशी मागणी नागरीक करीत आहे.
जागेची पाहणी करून घेणार निर्णय – सीओ पाटील
या रस्त्याच्या जागेची पाहणी करणार असुन अभियंत्यासोबत चर्चा सुध्दा करणार आहे. तसेच याची चौकशी करून लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे मुख्याधिकारी रविंद्र पाटील यांनी सांगितले.