अखेर सावंगा (बु.) मध्ये टँकरने पाणीपुपवठा सुरू – संदिप सोळंके यांच्या मागणीला यश

0
702
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .) 
     चांदूर रेल्वे लगतच असलेल्या सावंगा (बुजरूग) या गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असुन संदिप सोळंके यांच्या मागणीला यश आले आहे.
     चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगा (बुजरूग) हे गाव बेंबळा प्रकल्प, यवतमाळ मध्ये बाधीत झाले असुन २००८ साली हे गाव रेल्वे स्टेशनच्या बाजुला वसलेले आहे. पुनर्वसित गावात पुरक नळ योजनेची कोणतीही व्यवस्था करून दिलेली नाही. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात २ महिने या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. परंतु यंदा टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नसल्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झाली होती. ही बाब भाजपा सरचिटणीस संदिप सोळंके यांनी प्रताप अडसड यांच्याकडे सांगितली. याचा पाठपुरावा जिल्हाधिकारी,   यवतमाळ येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे केल्यानंतर अखेर या गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यासाठी खासदार रामदास तडस यांनीही सहकार्य केले.
          सदर पाणीपुरवठा टँकरने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे अक्षय कठाडे, विलास इरतकर, वैभव गिलबिले, उमेश सोळंके, बंडुभाऊ मेटकर, गजानन डुबे, बालु जेंद्रे, रोशन कुंभरे, राहुल अंबाडेरे, ग्रा.प. सदस्य सौ. प्रमिला मेटकर, सौ. शितल सोळंके, सौ. माया गोडघाटे आदींनी आभार व्यक्त केले.