अकोटात चोरट्यांचा तिन घरावर डल्ला सोन्याच्या दागींन्यासह रोख रक्कम लंपास

0
715
Google search engine
Google search engine

आकोटः-संतोष विणके –

शहरातील अकोला मार्गावर असणाऱ्या रामा रेसीडंन्सीला चोरट्यांनी लक्ष करत 3 घरातुन सोन्याचे दागीने ,रोख रक्कम अश्या १लाख ६२ हजाराच्या मुद्देमालावर हात सफा केला.घरफोडीची ही घटना काल दि.१३ ला उघडकीस आली.रामदास फाटे रा. रामा रेसिडन्सी यांच्या घरासह परीसरातीलच विशाल सोनोने व सुरज देशमुख या तिघांच्या घरावर चोरट्यांनी हात सफा केला.या घरफोडीत चोरट्यांनी राणी हार,मिनी मंगळसुञ,लहान आंगठी ,कानातले रिंग,कानातले झुमके ,मोठी अंगठी अशी सोन्याची दागीने व नगदी असे एकुण १ लाख ६२ हजार चा मुद्देमाल चोरुन नेला.याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध विविध कलमांद्वारे चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळी पोलीसांनी ठसे तज्ञांना पाचारण केले असुन पोलीसांनी तपास सुरु केला आहे.लग्नसराई,तथा सुट्यांचा मोसम आसल्याने चोरट्यांचे फावत असुन.पोलीसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे.तर बाहेरगावी जातांना नागरीकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.यापुर्वी देखील आसरा कॉलनी,सरस्वती नगर व आता अकोला रोड वर चोऱ्या झाल्यात त्यामुळं हा चोरटा शहरातीलच असावा अशी चर्चा आहे.