सोमवारी सुध्दा नाफेडचा बारदाना ‘आऊट ऑफ स्टॉक!’ – शेतकऱ्यांच्या तुरीच्या गाड्यांची लांबच लांब रांग >< आज नाफेड तुर खरेदीचा शेवटचा दिवस

0
1017
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
शासनाने नाफेड अंतर्गत हमी भावाने सुरू केलेली तूर  खरेदीचा तूर्तास पुर्णता बोऱ्या वाजला असून खोदा पहाड निकला चुहा अशीच अवस्था झाली असल्याचे चित्र आहे. बारदाना अभावी सोमवारी सुध्दा नाफेड खरेदी बंद असल्यामुळे गाड्यांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
      सोमवारी शेतकऱ्यांनी आपली तुर चांदूर रेल्वे बाजार समितीत आणली होती. बाजार समितीतुन शिक्षक बँकेपर्यंत गाड्यांच्या लांब रांगा लागल्या होत्या. परंतु बारदाणा नसल्यामुळे या शेतकऱ्यांची तुर खरेदी करण्यात आली नाही. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना तुर वापस न्यावी लागली. आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांकडे तूर पडूनच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. नाफेड’ने १५ मे नंतर कोणत्याही प्रकारची तूर खरेदी करणार नसल्याचं पत्र जारी केलं आहे. बारदाना उपलब्ध नसल्याने अगोदर पासूनच तुरीची खरेदी खोळंबली आहे. त्यातच आता नाफेडने हात वर केल्याने शेतकऱ्यांनी कुणाकडे पाहायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकाही शेतकऱ्याला फोन लावलेला नाही – सचिव इंगळे 
बारदाणा उपलब्ध नसल्यामुळे नाफेड तुर खरेदी बंद असल्याची सुचना पहिलेच लावली होती. तसेच एकाही शेतकऱ्याला फोन केलेला नाही. तरीही शेतकरी तुर घेऊन बाजार समितीत आल्याचे बाजार समिती सचिव चेतन इंगळे यांनी सांगितले.
तहसिलदार, प्रभारी तहसिलदार सुट्टीवर
नाफेड तुर खरेदी सुरू नसल्यामुळे शेतकरी निवेदन घेऊन तहसिल कार्यालयावर गेले होते. परंतु तहसिलदार, प्रभारी तहसिलदार सुट्टीवर असल्यामुळे हिरमुसले तोंड घेऊन शेतकऱ्यांना परतावे लागले. एसडीओ मॅडमसुध्दा सोमवारी कार्यालयात नसल्याचे समजते.