आज अपंगांकरिता स्वावलंबन कार्ड बनविण्याचे शिबीर – अपंग जनता दलाचे आयोजन

0
1149

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान .) 

       अपंगांचे जलद गतीने विकास व्हावे व बोगस अपंगांवर आळा बसावा यासाठी स्वावलंबन कार्ड (युनिक डिसअॅबिलीटी आयडी कार्ड)  बनविण्याच्या शिबीराचे आयोजन अपंग जनता दलातर्फे आज (ता. १८) करण्यात आले आहे.
आधार कार्ड प्रमाणेच अपंगाना ओळखपत्र जे देशातील सर्वच राज्यात अपंग प्रमाणपत्र म्हणून चालणार आहे. या कार्डवर रेल्वे पास, बस पास, पेन्शन योजना, अनेक योजनांचा लाभ घेता येणार असल्याचे अपंग जनता दलाच्या वतीने सांगण्यात आले. तसेच या शिबिरात जिल्हा परिषद, समाज कल्याण,  नगरपरिषद ३% योजनेचे, अपंग कर्ज योजनेचे (दीड लाख) अर्ज भरणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन ज्येष्ठ अपंग नेते सुधाकर काळे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अपंग जनता दलाचे अध्यक्ष शेख अनिस, कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ अपंग समाजसेवक गोकुळ रॉय राहणार आहे. या शिबिराचे आयोजन आज शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत पंडित जवाहरलाल नेहरू पूर्व माध्यमिक शाळा, आठवडी बाजार चांदूर रेल्वे येथे करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील, तालुक्यातील अंध, मुकबधीर, कर्णबधीर अपंग प्रमाणपत्र आहे त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अपंग प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, दोन पासपोर्ट साईज फोटो असे सर्व कागपत्रे व १०० रूपये फि घेऊन हजर राहणे आवश्यक असल्याची माहिती अपंग जनता दलाचे शहराध्‍यक्ष गोपाल वनवे, तालुकाध्यक्ष प्रमोद शेबे, निकिता कावरे, शंकर खडसे, विजूमला गोदे, सूर्यकांता गायगोले यांनी दिली.