नगरसेवकानी काढली सुखलेल्या झाडाची प्रेत यात्रा

0
1286

शेगांव:- शिवसेना व राष्ट्रवादीच्याकॉग्रेस व कॉंग्रेस च्या नगरसेवकांनी काढली सुकलेल्या झाडांची न.प. वर प्रेत यात्रा!

शेगांव नगर पालिकेच्या हद्दीअंतर्गत विकास आराखड्यामधुन रस्त्याची कामे करण्यात आली. तर या रस्त्यालगत शहरभर हजारो झाडांची लागवड न.प.च्या वतीने करण्यात आली. मात्र ही झाडे पाण्याअभावी सुकत असल्याने याबाबत प्रशासनाची झोप उघडविण्यासाठी आज शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा नगर पालिकेवर पोहचवुन आंदोलन केले. या आंदोलनामुळे हडबडुन गेलेल्या न.प. प्रशासनाने आंदोलनकर्त्याविरोधात काम बंद आंदोलन पुकारुन कर्मचार्‍यांनी पोलीसात कार्यवाही साठी निवेदन दिले. शेगांव विकास आराखड्याअंतर्गत रस्त्यांच्या कामांसाठी शहरातील शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली. मात्र शहर विकास करीत असतांना या झाडांच्या मोबादल्यात हजारो झाडे शहराच्या हद्दीत लावण्यात आली. अनेक भागांमध्ये नगर पालिका व शहरातील दानशुर संस्थांच्या वतीने ट्री- गार्ड ही लावण्यात आले. मात्र भर उन्हाळयामध्ये या झाडांना पाणी नसल्याने शहरातील शेकडो झाडे पुर्णपणे सुकली आहेत. तर हजाराच्या वर झाडे सुकण्याच्या मार्गावर आहे. या झाडांना नगर पालिकेने टँकर व्दारे पाणी पुरवठा करावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली होती. यावर मुख्याधिकार्‍यांनी टँकरव्दारे लगेच पाणीपुरवठा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र आश्वासनाची पुर्ती झाली नसल्याने आणि झाडे मृत पावण्याच्या संख्येत वाढ होत चालल्याने आज गुरुवारी शिवसेनेच्या आदींनी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान शिवाजी चौक येथुन सुकलेल्या झाडांची प्रेत यात्रा काढुन न.प.मुख्याधिकारी अतुल पंत यांच्या थेट कॅबिन समोर धडकवली. यावेळी पोलीसांनी अडविल्याने ही तिरडी यात्रा कॅबिनच्या आत पोहचविता आली नाही. दरम्यान आंदोलकांनी न.प.च्या इमारतीमध्ये तिरडी ठेवून उभे राहले शिवाय हे आंदोलन तिन पक्षांनी मिळुन केल तरी ईथे कार्यकत्यांचा अभाव दिसत होता.मुख्याधिकारी संतप्त कर्मचाऱ्यांनी केले काम बंद दिली पोलिसात तक्रार.

परंतु दुसरीकडे आम्ही २ वर्ष अगोदर विकास आराखडा पोस्ट मार्टम म्हणुन आपनास बातमी दाखवली होती ज्यात ऐक नेता भविष्य तिल पीढीला या झाडांचा फायदा होईल या हेतुने विकास आराखडा मधील झाडांचे सांगोपन केले आज पहा ति झाडे कशी डोलतांना दिसत आहे सांगाव हेच वाटते कि सगळ प्रशासन का करील काही करण्याची जवाबदारी आपली सुद्धा आहे.