काँग्रेस ने रंगवले 2मिनिटांचे आंदोलन नाट्य

0
560
Google search engine
Google search engine

शेगांव : नाफेडमार्फत खरेदी केलेल्या तुरीचे कोट्यवधी रुपये गेल्या २ महिन्यांपासून शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. शिवाय मुंग उडीद हमीभावापेक्षा कमी दरानेखरेदी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.सदर चुकारे तात्काळमिळवे यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगांवात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी एक रास्ता रोकोचे आंदोलन नाट्क करण्यात आले. हे आंदोलन अवघ्या २ मिनिटात गुंडाळून आंदोलकांनी स्वतःहून पोलिसांच्या गाडीत बसून रवाना झाल्याने हे आंदोलन फक्त अण्णदात्याच्या डोळ्यात धूळफेक साठी तर केल्या गेले अशी चर्चा शहरात रंगत आहे.
शेतकऱ्यांचे तुरीचे पैसे लवकर मिळावे आणि उडीद मूग नाफेडमार्फत खरेदी करण्यात यावी, यासाठी शासनाची झोप उडविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्ह्याभरात रास्तारोको करण्याच्या सूचना जिल्हा काँग्रेस कडून होत्या. त्यानुसार आंदोलन झाले हे दाखविण्यासाठी शेगावात २ मिनिटाचे आंदोलन नाट्य रंगविण्यात आले. मात्र राष्ट्रीय पक्षाच्या या आंदोलनात फक्त २० ते २५ कार्यकर्तेच उपस्थित राहिल्याने या आंदोलनाची पुरती खाल्ली उडविल्या गेली. सत्ता गमावल्याने काँग्रेस पक्ष हे सध्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. यामुळे आंदोलनाची कधीच सवय नसलेल्या पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना आंदोलन आणि निवेदने देणे जिव्हारी येते.कारण नेहमी ACतच राहनारे कॉंग्रेस नेते ना आदेश पाळणे गरजेचे असल्याने शेगाव सारखे मॅनेज आंदोलने सध्यासर्वदुर होत आहे. मी मारल्यासारखे करतो तू रडल्या सारखे कर अश्या प्रकारे पोलिसांशी साठगाठ करून आंदोलने सुरु आहे. यामध्ये आज झालेले आंदोलन हे त्यातीलच एक असल्याचे बोलल्या जाते पण जनता ही हुशार म्हणजे (ये पब्लिक है सब जानती है )या आंदोलनात
जळगाव मतदारसंघाचे नेते रामविजय बुरुगले जिल्हा समिती सदस्य शैलेन्द्र पाटील ,माजि अध्यक्ष केशव हिंगणे तसेच काँग्रेसचे आंदोलक नेते किरण देशमुख, जयंतराव खेडकर प्रफुल ठाकरे असे भरपुर कार्यकर्ते हजर नव्हते जेव्हा कि कालच काढलेल्या फक्त ६ कार्यकर्त्याच्या आंदोलनात नगरसेवक प्रफुल ठाकरे होते.
त्यामुळे अस म्हणाव लागते कि आजच्या आंदोलनात पक्षातील एकही मोठा नेता दिसून आला नाही. महिला काँग्रेसचे तर हाल बेहाल आहेत. या आंदोलनात मीरा माळी ह्या एकमेव महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. एकण दरीत “अ” “ब” “क” गटाचे वरिष्ठ कार्यकर्ते अनुपस्थित दिसले. नव्याने काँग्रेस पक्षात आलेले ज्ञानेश्वर पाटील यांनी मात्र या आंदोलनाला हजेरी लावली. मात्र आंदोलन संपताच ते पोलीस स्टेशन ला न पोहचता स्वतःच्या वाहनाने घरी निघून गेले. उल्लेखनीय म्हणजे शिवाजी चौकात फक्त २ मिनिटे १० सेकंद हे रास्ता रोको करण्यात आले. फोटोसेशन झाल्या नंतर आंदोलक मंडळी हे स्वतःहून पोलिसांच्या वाहनात जाऊनबसले हे विशेष. शेतकऱ्यांचा कळवळा दाखविण्याच्या प्रयत्नात काँग्रेस पक्षाची पोलखोल मात्र या आंदोलनाने खुलली येव्हडे मात्र खरे…..