गाढे पिंपळगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडिया चा शेतकरी मेळावा संपन्न

0
843
Google search engine
Google search engine

बीड,परळी वैजनाथ: नितीन ढाकणे

तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने दि. २० मे रोजी शेतकरी मेळावा संपन्न झाला.
या शेतकरी मेळाव्यास स्टेट बँक ऑफ इंडिया चे सहाय्यक महाप्रबंधक सुरेश गुळवे, परळी शाखेचे शाखा प्राबधक प्रभाकर सहारे, माजी समाजकल्याण सभापती प्रभाकर वाघमोडे, प्रगातीशील शेतकरी नाथराव कराड, वैद्यनाथ बँकेचे संचालक व्यंकटराव कराड, डी. सी. सी. बँकेचे संचालक शरदराव राडकर, उपसरपंच रामेश्वर वाघमोडे, वकील संघाचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख, मधुकर राडकर, रानबा गायकवाड, भगवान साकसमुद्रे, किरण साहेब, बडे साहेब आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी सहाय्यक महाप्रबंधक गुळवे तसेच शाखा प्रबंधक प्रभाकर सहारे यांनी शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिंवजी महाराज शेतकरी स्वाभिमान योजना या अंतर्गत कर्जदारांना झालेल्या १.५ लाख रुपये पर्यंतच्या कर्जमाफीची माहिती दिली व कर्जदारांकडे असलेली उर्वरित कर्जाची रक्कम बँकेत भरल्यास बँकेच्या वतीने ४०% पर्यंत सूट देण्यात येईल असे सांगितले. लागवडीप्रमाणे शेतकऱ्यांना पीक कर्ज, वैयक्तिक विमा, अपघाती विमा, आरोग्य विमा आदींचीही माहिती दिली.
या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही सहारे यांनी उत्तरे दिली. या शेतकरी मेळाव्यास गाढे पिंपळगाव व परिसराती शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ऍड. राजेश्वर देशमुख यांनी केले.