अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची वर्धा जिल्हा कार्यकारणी गठीत.

0
926

पुलगाव / विशेष प्रतिनिधी :-

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची जिल्हा बैठक व कार्यकारणी बांधणी दिनांक २०/०५/२०१८ रोजी विश्राम भवन पुलगाव येथे पार पडली. संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष श्री मधुसूदन कुलथे यांची प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली व त्यांच्याच हस्ते सभेला मार्गदर्शन व संघटना बांधणीचे कार्य करून कार्यकारणी घोषित केली. कार्यक्रमाची सुरवात केंद्रीय अध्यक्ष श्री मधुसूदन कुलथे यांना संघटनेतील सर्व सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे केंद्रीय सदस्य हर्शल काळे यांनी केले. त्या नंतर संपूर्ण पत्रकार बांधवांचा परिचय देण्यात आला. केंद्रीय कार्याध्यक्ष श्री मधुसूदन कुलथे यांनी आपल्या मार्गदर्शनातून आपले मत व्यक्त केले.

शासना कडून पत्रकारांना होत असलेला दुजाभाव, पत्रकारांना शासनाच्या योजना, अधिस्वीकृती विषयी चुकीचे धोरण अश्या निरनिराळ्या प्रश्नांवर मार्गदर्शन व शासन दरबारी रेटून धरण्याचे विषय हे जो पर्यंत संपूर्ण पत्रकार एका छता खाली येईन कार्य करणार नाही तो पर्यंत ग्रामीण पत्रकार हा शासन योजने पासून वंचितच राहील व या संपूर्ण कायद्याचा योजनेचा आपल्याला उपयोग मिळवून घ्यायचा असेल तर पत्रकार एकत्र येऊन कार्य करण्याची गरज आहे, असे अनेक प्रश्नांवर भर देऊन योग्य मार्गदर्शन व पत्रकारांच्या हितार्थ असलेले विषय घेऊन ते बोलले.
व वर्धा जिल्हा कार्यकारणीची घोषणा केली. व सर्व पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात वर्धा जिल्हा अध्यक्ष पदी श्री आशिष पांडे यांची नियुक्ती करण्यात आली, तर वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष पदी चंद्रशेखर भेंडे (संपादक-दक्ष तरुणाई) यांची नियुक्ती करण्यात आली. वर्धा जिल्हा उपाध्यक्ष श्री राजू वाटाणे तर वर्धा जिल्हा सचिव सचिन सुरसे यांची नियुक्ती करण्यात आली. वर्धा जिल्हा सहसचिव हर्षवर्धन गादगे तर वर्धा जिल्हा संघटक म्हणून दीपकराव तिवरे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित व कार्यक्रम यशस्वी करण्या करिता आशिष पांडे, चंद्रशेखर भेंडे, श्री राजू वाटाणे, सचिन सुरसे, हर्षवर्धन गादगे, दीपकराव तिवरे, मयूर अवसरे, आशिष ठाकरे, गोपाल काळे, प्रशांत मेटे, मयूर सहारे, मारोती ओंकार, बिट्टू रावेकर, नितीन चंदनमाथे,बाबाराव पवार, हेमंत तुपकरी, जय महल्ले, व प्रवीण फुसाटे, हर्शल काळे यांनी सहकार्य केले व संघटना वाढवण्याची व सामाजिक उपक्रम राबविण्याची ग्वाही संपूर्ण पत्रकार बांधवांनी केंद्रीय अध्यक्ष यांना दिली.