अधिक मास निमित्य श्रीराम मंदीरात विविध कार्यक्रम

0
828
Google search engine
Google search engine

आकोटःसंतोष विणके –

श्री राम मंदिर संस्थान शनवारा अकोट येथे अधिक मास निमित्य दिनांक २४/०५/२०१८ ते दिनांक ३०/०५/२०१८ पर्यंत संगीतमय श्रीमद् भागवत कथा हभप श्रीराम गदाधर शास्त्री अकोला यांच्या मधूर वाणीत होणार आहे.ही कथा रोज सकाळी ८ ते १२ या वेळेत संपन्न होणार आहे.
तसेच दिनांक २५/०५/२०१८ ते २७/०५/२०१८ पर्यंत रोज सायंकाळी ६ ते ८ सौ. शुभांगी दिपक जोत यांचे हरिसंकिर्तन संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या विजय ग्रंथ पोथीवर आधारित हरिकिर्तन होणार आहे.अधिकमास निमित्त सर्व भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान शनवारा अकोट यांनी केले आहे.