अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात जन्मली मत्सपरी

0
1347

१५ मिनीटांचेच आयुष्य आले वाट्याला; संशोधनासाठी होईल मदत

प्रतिनिधी :- दिपक गित्ते

अंबाजोगाई:- वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात आज (२१ मे) रोजी सकाळी ९ वाजणेचे सुमारास एका महिलेने विचित्र बाळाला जन्म दीला. या बाळाला वैद्यकीय परीभाषेत सीरोनोमेलिया (मत्सपरी) असे म्हणातात. सदरील बाळाला अवघे १५ मिनिटांचेच आयुष्य लाभले.
याबाबतची अधिक माहिती देतांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती व स्त्री रोग विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले की, काल सायंकाळी पट्टीवडगाव येथील एक महिला २० मे रोजी रात्री प्रसुती विभागात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आली होती.आज सकाळी आठ वाजणेच्या सुमारास तिला प्रसुती कळा सुरु झाल्यानंतर तिला प्रसुतीगृहात नेण्यात आले. यावेळी प्रसुती विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वर्षा वरपे, डाँ. प्रियंका खराणे, डॉ. कल्याणी मुळे, डॉ. पुनम देसाई, डॉ. सपना चिंचोले यांनी तिची प्रसुती केली. साधारणपणे सकाळी ०९:०० सुमारास तिने बाळाला जन्म दिला.   

सदरील बाळ बाहेरयेत असतांनाच एका विचित्र घटनेला आपण सामोरे जात आहोत याची कल्पना उपस्थित डॉक्टरांना आली. प्रसुतीनंतर बाळाची तपासणी केली असता बाळास दोन पायाऐवजी दोन पाय जोडलेला एकच पाय आणि लिंग नसलेले शरीर आढळून आले. सदरील महिलेची प्रसुती ही अत्यंत नॉर्मल झाली असली तरी बाळाची प्रकृती तशी जन्मतःच चिंताजनक होती. अशा विचित्र अवस्थेत जन्मलेल्या बाळाला अवघे १५ मिनीटांचे आयुष्य मिळाले.
या बाबत डॉ. संजय बनसोडे यांच्या कडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता डॉ. बनसोडे यांनी अशा अवस्थेत जन्मलेल्या बाळाला सीरोनोमेलिया (मत्सपरी) असे म्हणतात असे सांगून एका लाखात एक बाळ अशा पध्दतीने जन्माला येण्याची शक्यता असते असे ही त्यांनी सांगितले.
सदरील बाळाला जन्म देणारी माता ही पट्टीवडगाव येथील रहिवासी असून ती ऊसतोड कामगार आहे. या माताने गर्भधारणेनंतर कसलेही औषधोपचार घेतलेले नाहीत. एक महिन्यापूर्वी खाजगी रूग्णालयात सोनोग्राफी केली असता या बाळाच्या किडनी आणि फुफ्फुसात अडचण असल्याचे वैद्यकीय अहवालात नमुद करण्यात आले होते असे ही डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
अशा प्रकारच्या बाळाचे जन्माला येणे ही वैद्यकीय क्षेत्रात खुप दुर्मिळ गोष्ट असल्याचे सांगून किमान एक लाख बाळात एखादे असे बाळ जन्माला येण्याची शक्यता असते अलिकडील कांही वर्षात या वैद्यकीय महाविद्यालयातच नव्हे तर मराठवाड्यातच अशा प्रकारचे मत्सबाळ जन्माला येण्याची ही पहिलीच घटना आहे असे डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
सदरील बाळ (मत्सपरी) ही वैद्दकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागातील म्युझियम मध्ये वैद्दकीय विद्दार्थ्यांना अभ्यासासाठी व संशोधनासाठी ठेवण्याचा प्रयत्न चालू असल्याचेही डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.