बग्गी येथे बाल सुसंस्कार शिबीर संपन्न लोकवर्गनीतुन बेंच बसविण्याचा केला निर्धार

0
637
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – शहेजाद खान –
       तालुक्यातील बग्गी येथे पाच दिवशीय बाल सुसंस्कार शिबीर नुकतेच संपन्न झाले.
       बग्गी येथील राष्ट्रसंत चौकातील मानवता मंदिर येथे पाच दिवशीय बाल सुसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये शंकरराव गावंडे यांनी बौद्धिक वर्ग घेऊन शिबीरार्थ्यांना मार्गदर्शन केले तर श्रीकृष्ण बैलमारे यांनी सुध्दा मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व प्रशिक्षक प्रकाश चवाळे यांनी योगासने, लाठीकाठी, संगीत, भाषणशैली, सामुदायिक प्रार्थना, श्लोक, भजन व रंगकाम यांचे मार्गदर्शन केले. यानंतर समारोपीय कार्यक्रमात याची प्रात्यक्षिके शिबिरार्थींनी सादर केली.
        समारोपीय कार्यक्रमाला सरपंचा सौ. माकडे, देविदास शेबे, भगवान मेश्राम, सौ. सपना भेंडे, नलिनी गौळे, धनराज मोहोड, रामोजी गाईचारे यांची उपस्थिती होती. या शिबिरात चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शिबिरातील विद्यार्थ्यांनी सामाजिक उपक्रम हाती घेतला असून लोकवर्गणीतून बसस्टॉपवर बसण्यासाठी बेंच लावण्याचे ठरविले. याकरिता झोळी फिरवून गावातून लोकवर्गणी केली व त्यातून बसस्टाॅपवर बेंच लावण्याचे ठरविले असुन मोठ्या माणसांना लाजविणारा हा स्तुत्य उपक्रम आहे.
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अंतरा चवाळे हिने तर आभार प्रदर्शन सौ. विजया चवाळे यांनी मानले. राष्ट्र वंदना घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.