ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून आपल्यातील शौर्य गाजवा ! – नीलेश टवलारे हिंदु जनजागृती समिती <> परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शोर्य जागरण शिबीर….

0
941
Google search engine
Google search engine

 

अमरावती – रंगोली मंगल कार्यालय, कठोर रोड, येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने शौर्य जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला दीपप्रज्वलन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अभिषेक दीक्षित, सनातन संस्थेच्या सौ. विभा चौधरी, हिंदु जनजागृती समितीचे निलेश टवलारे यांनी केले.  विजयादशमी, नरकचतुर्दशी आदी हिंदूंचे सण हे शौर्यजागरण करणारेच आहेत. शौर्यापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाही. देवतांनी आम्हाला शौर्य जागृत करण्यासाठी शस्त्रे दिलेली आहेत. आपल्याला शौर्य जागृत करून हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे. जेव्हा जेव्हा शौर्य गाजवण्याची वेळ आली, तेव्हा तेव्हा आपण शौर्य गाजवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून पाच पातशाह्या उद्ध्वस्त करून शौर्य गाजवले. आपल्यालाही ईश्‍वरी अधिष्ठान ठेवून शौर्य गाजवायचे आहे, असे मार्गदर्शन समितीचे श्री. नीलेश टवलारे  यांनी शौयर्र् जागरणाचा उद्देश आणि आवश्यकता सांगतांना केले. या शिबिरात ७० हून अधिक धर्माभिमानी सहभागी झाले होते. शिबिराचा आरंभ शंखनादाने करण्यात आला. सूत्रसंचालन श्री. आनंद डाऊ यांनी केले. श्री. नीलेश टवलारे यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेविषयीचे विचार मांडले, तसेच साधनेविषयीचे मार्गदर्शन सौ. विभा चौधरी यांनी केले.

     शिबिरामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याची ध्वनिचित्रफीत या वेळी दाखवण्यात आली. या ठिकाणी क्रांतीकारांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. तसेच दैनंदिन जीवनात आपल्यावर ओढवणार्‍या प्रसंगात कसा प्रतिकार करावा,  छोट्या छोट्या प्रसंगात आपण स्वरक्षण कसे करू शकतो याविषयीचे प्रकार दाखवण्यात आले, ते करवूनही घेण्यात आले. स्वरक्षण प्रशिक्षण करतांना शिबिरार्थी ‘हर हर महादेव’च्या घोषणा देत होते. शिबिराची सांगता करण्यापूर्वी सर्वांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध रहाण्याची शपथ घेतली. तसेच रंगोली मंगल कार्यालयाचे नितीन देशमुख यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिला तर माऊली कॅटर्स आणि बिछायतचे वीरेंद्र थर्डक व सचिन खेडेकर यांनी पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

छायाचित्रे: १.दीपप्रज्वलन २.सहभागी धर्मभिमानी स्वसंरक्षण प्रात्यक्षिक करतांना.