घुईखेड येथे बाल संस्कार शिबिराचे आयोजन – भाजपा सरचिटणीस संदिप सोळंके यांनी दिली सदिच्छा भेट

0
723
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 

    दरवर्षी श्री गुरुदेव सेवा मंडळ, चांदुर रेल्वे यांच्या विद्यमाने उन्हाळी शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी तालुक्यातील घुईखेड येथे स्व. कमलाबाई टावरी बहुद्देशीय संस्था, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बाल संस्कार उन्हाळी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराला भाजपा सरचिटणीस संदिप सोळंके यांनी नुकतीच सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

     घुईखेड येथे मुरलीधर मुंधडा यांच्या मार्गदर्शनांतर्गत सदर शिबीर सुरू असुन या शिबिरामध्ये जवळपास दीडशे विद्यार्थी लाभ घेत आहे. या शिबिरामध्ये लाठी – काठी, जुडो – कराटे, दांडपट्टा, धनुर्विद्या, बौद्धिक, संगीत, योगा प्राणायाम आदींचे प्रशिक्षणाचे धडे दिल्या जात आहे. या शिबिरामध्ये अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या असून नुकतेच भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस संदीप सोळंके यांनी सुध्दा भेट दिली. या बालसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांच्या शरीराला एक नवी ऊर्जा मिळते व विद्यार्थी या संस्कारातून घडल्या जात असल्याचे प्रतिपादन संदीप सोळंके यांनी यावेळा केले.

      शिबिराच्या यशस्वितेकरिता मुरलीधर मुंधडा अथक परिश्रम घेत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील लहानु मेश्राम, सचिन मेहर, अशोक नवघरे, संजय चनेकार, तुळशीदास वैद्य, डॉ. हेमंत जाधव, पप्पू उर्फ आशुतोष गुल्हाने यांचे सहकार्य लाभत आहे.