विहिरीत पडलेल्या हरणाला वाचविण्यात यश – वन विभाग व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून दिले जीवदान

74

कडेगांव / हेमंत व्यास :/

तडसर (ता.कडेगाव जि. सांगली) – येथे वनक्षेत्रालगतच्या विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभाग व ग्रामस्थांनी यशस्वीरीत्या बाहेर काढून जीवदान दिले. त्यामुळे आज जागतिक जैव विविधता दिन खऱ्या अर्थाने साजरा झालातडसर येथे वनक्षेत्रालगत गंगाराम तुकाराम जाधव यांची विहिर आहे.

वनक्षेञात पुरेसे पाणी उपलब्ध नसल्यामुळे अनेक वन्यजिव पाण्याच्या शोधात बाहेर पडतात.हे हरिण सुध्दा उन्हाळ्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याने पाण्याच्या शोधात असलेले हरीण वनक्षेञाचे तार कंपाऊड मधून बाहेर आले.तडसर गावाच्या हाद्दीतील जाधव यांच्या विहिरीत पडले. ते विहीरीतून बाहेर येण्यासाठी धडपडत होते.श्री.जाधव यांनी सकाळी साडेआठ वाजता वन विभागाला माहिती दिली. त्यानंतर कडेगाव वन विभागाचे वनक्षेत्रपाल नितीन काळेल यांच्यासह वन विभागाच्या कर्मचारी व ग्रामस्थ हरणाच्या सुटकेसाठी दाखल झाले.

सर्वांनी जाळीच्या सहाय्याने केवळ अर्ध्या तासात हरणालाविहिरीतून बाहेर काढले. खोल विहिरीतून बाहेर व निसर्गाच्या सहवासात येताच अत्यानंदाने हरणाने टुनकण उडी मारत येथील वनक्षेत्रातील अधिवासात धूम ठोकली.हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाल्याने वन विभागाच्या कर्मच्याऱ्यांनीही समाधान व आनंद व्यक्त केला आणि खऱ्या अर्थाने जागतिक जैव विविधता दिन साजरा झाल्याची प्रतिक्रिया दिली.
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वनक्षेत्रपाल नितीन काळेल, वनपाल ए.पी.सवाखंडे, मोहन महाडिक, वनरक्षक, जितेंद्र खराडे, सिकंदर मुल्ला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

जाहिरात
नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।