अभिनेते सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेचा विरोध

91

नवी देहली – अभिनेते सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ या चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेने विरोध केला आहे. चित्रपटाच्या नावामध्ये हिंदु सणाचा उल्लेख असल्याने विहिंपने याला विरोध केला आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, देशातील कोणत्याच चित्रपटगृहात आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटाच्या नावामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जाव्यात, असे आम्हाला मुळीच वाटत नाही. ‘नवरात्री’च्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटातून याचा वेगळाच अर्थ प्रेक्षकांपर्यंत जात आहे.