अवैध जनावर वाहतूक करणारे पोलिसांच्या जाळ्यात

अवैध जनावरे यांची वाहतूक करणारे शिरजगाव कसबा पोलिसांच्या जाळ्यात
नियोजन बद्द पद्धतीने होत होती वाहतूक,अवैध जनावर वाहतूक चे मूळ मध्यप्रदेश मध्ये

चांदुर बाजार :-

चांदुर बाजार तालुक्यात येणाऱ्या शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन हद्दीतील कारंजा बहिरम मार्गे अवैध जनावरांची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती च्या आधारे शिरजगाव कसबा पोलिसांनी एकूण 14 जनावरांची जिवंत सुटका केली आहे..

ट्रक क्रमांक DL 01/0152 मध्ये ट्रकच्या आता खाच्या तयार करण्यात आला.त्यामध्ये जनावर याना बसविण्यात आले.त्यानंतर कोणाच्या लक्ष्यात येऊ नये या करिता गव्हचा गव्हनडा चे पोते भरून ठेवण्यात आले.त्यामुळे ट्रक च्या आत फक्त गव्हनडा असल्याचे दिसत होते.मात्र शिरजगाव कसबा येथील ठाणेदार मुकुंद कवाडे यांना शंका आली त्यांनी ट्रक ची पाहणी केली तर त्यांना त्यामध्ये एकूण 14 जनावरं निर्दयी पणे कोडलेलं असल्याचे दिसले त्यांनी त्याची सुटका केली आणि त्याचा बरोबर ट्रक ला वाट दाखविणाऱ्या MH 01 PA 9508 क्रमांक असलेली रिट्स आणि MP 15 A 4363 क्रमांकाची स्कारपियो पोलिसांनी ताब्यात घेतली.या कार्यवाही मध्ये पोलिसांनी तब्बल 19 लाख 40000 रूपयाचा माल आणि 5 आरोपी याना अटक केली.आणि जनावर याना रासेगाव अचलपूर येथील गौरक्षण मध्ये पाठविण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार कवाडे यांनी *विदर्भ 24 न्युज पोर्टल* ला दिली.या मध्ये आरोपी समदखा बब्बूखा वय 60 वर्ष रा.कखद भोपाळ मध्यप्रदेश, शे.मोबिन शे.हबीब वय 35 रा.करजगाव महाराष्ट्र, असिफखा हनिफखा वय 23 वर्ष रा.भोपाळ मध्यप्रदेश, जावेदअली उर्फ चांद सैदु रहमान वय 39 वर्ष भोपाळ,मो.तोफिक अ. गफ्फार वय 40 वर्ष रा.परतवाडा याना अटक करण्यात आली.

​बॉक्स​
​चांदुर बाजार मध्ये अश्याच प्रकारचं ओहोरलोड ची गव्हाच्या कुटार ची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे.नेमकं त्या ट्रक मध्ये गव्हचा कुटार च आहे की आणखी काय ?याची तपासणी कोण करणार हा प्रश्न उभा आहे. तर आयपीएस अधिकारीम्हणून चांदुर बाजार पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले ठाणेदार समीर शेख या कडे लक्ष देतील का हे पाहावे लागेल.​

ही कार्यवाही शिरजगाव कसबा चे ठाणेदार मुकुंद कवाडे पोलीस उपनिरीक्षक सुबोध वंजारी,पोलीस कॉस्टबल विनोद इंगळे, अ. कलीम शेख,भुणेश्वर तायडे,साहेबरावजी राजस,अरुण कळस्कयांनी केली.सर्व आरोपी याना न्यायालयात हजर करण्यात आले असून शिरजगाव कसबा पोलिसांनी पीसीआर मागितला असून सर्व आरोपी याना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.