विधान परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे 314 मतानी विजयी

0
941
Google search engine
Google search engine

रत्नागिरी – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे 314 मतानी विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या अॅड राजीव साबळे यांचा पराभव केला.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत सभागृहात ही मतमोजणी झाली. शिवसेना उमेदवार अँड. राजीव साबळे कि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. कोकण विधान परिषद निवडणुकीत भाजपने उघडपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ दिल्याचे रायगडमध्ये पहायला मिळाले. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या पाठीमागे शेकाप, काँग्रेस आणि महत्वाचे म्हणजे खासदार नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष उभा होता. तर दुस-या बाजूला शिवसेना मात्र एकाकी पडली होती. निवडणुकीत अनिकेत तटकरे यांना 620 मते मिळाली तर राजीव साबळे यांना 306 मते पडली. अनिकेत तटकरे 314 मतानी विजयी झाले. या मध्ये १२ मते बाद ठरली.
दरम्यान या निवडणूकीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये 100 टक्के मतदान झाले होते. तर रायगडमध्ये 469 पैकी 467 मतदारांनी मतदान केले होते.