परळीतील कामगार पाल्यांना सात लाख ८० हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर

0
801
Google search engine
Google search engine

३१५ विद्यार्थ्यांना लाभ; कामगार कल्याण केंद्राचा उपक्रम

शहरातील विविध आस्थापनेतील कामगारांच्या मुलांना लाभ

बीड,परळी वैजनाथ : नितीन ढाकणे

कामगार कल्याण केंद्राच्या वतीने शहरातील ३१५ कामगारांच्या पाल्यांना सात लाख ८० हजार रूपयांची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. सन २०१७-१८ करीता ही शिष्यवृत्ती देण्यात आली. कामगारांच्या मुलामुलींना ते शिकत असलेल्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाकरीता अधिक मदत मिळावी या उद्देशाने शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. विशेष गुण संपादित केलेल्या कामगारांच्या गुणवंत पाल्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली.
एवढ्या मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती मंजूर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यात दहावी पासून पदवी व पदव्युत्तर तसेच पाॅलीटेक्नीक, अभियांत्रीकी व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. २००० ते ५००० रूपये पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते.
दहावीच्या ६० विद्यार्थ्यांना एक लाख २० हजार रूपये, अकरावीच्या ८४ विद्यार्थ्यांना एक लाख ६८ हजार, बारावीच्या ४६ विद्यार्थ्यांना ९२ हजार, पदवीच्या ( बी. ए., बी. एस्सी., बी. काॅम.) ५० विद्यार्थ्यांना एक लाख २५ हजार, पदव्युत्तरच्या १० विद्यार्थ्यांना ३० हजार तर पाॅलीटेक्नीकच्या ३२ विद्यार्थ्यांना ८० हजार, अभियांत्रिकीच्या २९ विद्यार्थ्यांना एक लाख ४५ हजार तर वैद्यकीयच्या तीन विद्यार्थ्यांना १५ हजार आणी एमपीएससी पुर्व परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या एका पाल्यास ५ हजार असे एकूण ३१५ विद्यार्थ्यांना सात लाख ८० हजार रूपयांचे शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली. कामगार पाल्यांच्या बँक खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे.

यात वैद्यनाथ शुगर, परळी एस. टी. आगार , गजानन एक्स्ट्रॅक्शन ऑईल मिल, महावितरण , महापारेषण, सहकारी बँका, पनंगेश्वर शुगर, गंगाखेड शुगर, जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांच्या मुलांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त पाठ्यपुस्तक सहाय्यता योजनेंतर्गत ४३ विद्यार्थ्यांना ७२ हजार रूपये मंजूर करण्यात आले. तसेच क्रीडा शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, गंभीर आजार अनुदान योजना राबविली जाते. याचा लाभही कामगारांनी घ्यावा, असे आवाहन केंद्र संचालक आरेफ शेख यांनी केले आहे.