संयुक्त राष्ट्राच्या 15 व्या जागतिक धम्म परिषदेसाठी राजरत्न आंबेडकर थायलंड येथे सहभागी ; अनेकांकडून शुभेच्छा

0
1175
Google search engine
Google search engine

बीड नितीन ढाकणे:

संयुक्त राष्ट्राच्या 15 व्या जागतिक बौध्द धम्म परिषदेसाठी भारतातून भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतु राजरत्न आंबेडकर थायलंड येथील बँकॉक येथे सहभागी झाले आहेत. या परिषदेस जगभरातून 85 देशांचे प्रतिनिधी सामील झाले आहेत. दि. 25 मे रोजी भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी परिषदेत सांगितले की, माझा देश जरी छोटा असला तरी बुध्दांच्या सांगितलेल्या तत्वावर चालत  असल्यामुळे संपूर्ण विश्‍वात एक वेगळे स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. आज दि. 26 मे रोजी भारतातून भारतीय बौध्द महासभेचे प्रतिनिधीत्व करणारे राजरत्न आंबेडकर हे संबोधित करणार आहेत व थायलंडला जाण्यापूर्वी त्यांच्या कुटूंबातील प्रमुख मीराताई आंबेडकर यांनी त्यांना मंगल कामना व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. परळी येथील भारतीय बौध्द महासभेचे राज्य युवक संघटक विवेक झिंर्जुडे,  पत्रकार अनिल चिंडालीया, फुले-आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक भगवान साकसमुद्रे, न.प.चे माजी सभापती पंडित झिंर्जुडे, ओमप्रकाश शिंदे, डॉ. धम्मपाल रोडे, पप्पु रोडे, आकाश सावंत, राम भोसले, बाबासाहेब गायकवाड आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.