फक्त २०ते२५ कार्यकर्त्यानि केला विश्वासघात दिन साजरा

0
657
Google search engine
Google search engine

शेगांव : मोदी सरकारने आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केलेली नाही. म्हणूनच २६ मे रोजी मोदी सरकार सत्तेवर येऊन चार वर्षे पूर्ण हाेतील. हा दिवस विश्वासघात दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, असे काँग्रेसने स्पष्ट केले होते. मात्र शेगांवात पक्षाने दिलेले कुठलेही आंदोलन न करता अनेक ठिकाणी पार पडलेले पेट्रोल डिझेल दर वाढीच्या विरोधातील आंदोलन २० ते २५ कार्यकर्त्यांच्या समवेत हा मोर्चा मंदिर परिसरातून ते तहसील कार्यलया वर काढण्यात आला.ही यात्रा बैलबंडीत दुचाकी वाहन ठेऊन निघाली जसजशी ही प्रेत यात्रा काँग्रेस कार्यकर्यांच्या घर  किंवा दुकाना समोरून जात होती कार्यकर्ते आप आपल्या सोईने यामध्ये समाविष्ट होत होते. काही कार्यकर्ते तर थेट तहसिल कार्यालयाजवळ जाऊन पोहचले होते.आज पुन्हा यामध्ये एक गट उपस्तीत नव्हता व कार्यकर्त्या चा अभाव दिसून आला. विशेष म्हणजे आज शासकीय सुट्टी असतांना ही मंडळी निवेदन देण्याकरिता चक्क तहसीलवर पोहचली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारला चार वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा दावा करून प्रदेश काँग्रेस ने जिल्हा व शहर काँग्रेसच्या वतीने शनिवारी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढ विरोधात शेगांव तालुका काँग्रेस पक्षाने आज च्या विश्वासघात दिनाच्या आंदोलनात नेहमी प्रमाणे २० ते २५ कार्यकर्ते जमून पेट्रोल डिझेल दर वाढीच्या विरोधातील मोटारसायकची प्रेत यात्रा आंदोलन केले. हे आंदोलन करतांना या मंडळींना हे हि लक्षात आले नाहि कि आज शासकीय सुटी आहे. आणि निवेदन देण्यासाठी हि मंडळी तहसील कार्यालयावर पोहचली. शेवटी एका नायब तहसीलदाराला घरून बोलावून त्यांना निवेदन देण्यात आले. शहरात मोटारसायकलची प्रेत यात्रा फिरत असतानां कुठलाही मोठा नेता यात्रेत दिसून आला नाही मात्र आंदोलन तहसीलवर पोहचताच मोठे पक्षनेते हजर झाले.
महत्वाचे नगर सेवकांची अनुपस्थिती काँग्रेसच्या आंदोलनात आता नेहमीच फक्त २० ते २५ कार्यकर्ते उपस्थित राहतात. निवडणुकीच्या वेळेस तिकिटे मागण्यासाठी आणि पदे घेण्यासाठी रांगेत असणारी मंडळी मात्र पक्षाच्या आंदोलनात सहभागी नसतात. आजच्या आंदोलनातही ७ नगरसेवकांपैकी एकही प्रेत यात्रेत दिसून आला नाही. मात्र निवेदन देतांना तहसिलला ऐक नगर सेवक हजर झाले होते.

***यात ज्या प्रमाने रुदाली चित्रपटात रडण्याकरीता बाहेरुन लोकांना (स्त्री यांना)बोलावले जात होते त्याच प्रमाने कार्यकर्ते आणल्या सारखे दिसत होते .

नंतर काँग्रेसचे मोठे नेते आप आपल्या मोठया वाहनांनी घरी नोघून गेले. से सर्व पहात असताना एकच म्हणवस वाटते( ये पब्लिक है ये सबजाती है अंदर क्या है और बाहर क्या है)