दमदार तरुणाईचा मराठी सिनेमा ‘युवागिरी’

0
796
Google search engine
Google search engine
अनिल चौधरी, पुणे :-
अलिकडच्या काळात पौगंडावस्थेतील मुलांना सिनेमात घेऊन त्यांच्या माध्यमातून कुटुंबातील सगळ्यांना रूचेल, आवडेल अशी कथानके मराठी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावरून मांडली जात आहेत. तरुणाईचा सळसळता उत्साह अनेक मराठी सिनेमांमधून पाहायला मिळतो आहे. परंतु तरुणाईची मानसिकता नेमकी कशी आहे, तरुणाई नेमकी कसा विचार करते हे दाखविण्याचा प्रयत्न नव्या मराठी सिनेमातून निर्माते करणार आहेत. या नव्या दमाच्या मराठी सिनेमाचे नाव ‘युवागिरी’ असे आहे. युवागिरी या नावातच तरुणाई, युवकांचा उल्लेख आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच सळसळत्या उत्साहाच्या नव्या दमाच्या तरुण, अनोख्या कलावंतांची फळी यात पाहायला मिळणार आहे.
उत्तम कथानकाच्या माध्यमातून आजच्या तरुणाईची म्हणजे युवांची मानसिकता दाखविण्याचा प्रयत्न या सिनेमातून केला जाणार आहे. निर्माते राजू लक्ष्मण राठोड यांच्या प्रकाश फिल्म्सच्या ‘युवागिरी’ या सिनेमाचा टायटल लाँच समारंभ नुकताच पुण्यात झाला. या टायटल लाँच कार्यक्रमाला संजय खापरे, तेजा देवकर, मीरा जगन्नाथ अंकुर क्षीरसागर, या सिनेमाचे दिग्दर्शक योगेश जाधव तसेच सहनिर्माता जगदीश कुमावत, डीओपी मयुरेश जोशी, कार्यकारी निर्माता कुणाल निंबाळकर, कथा अंकुर क्षीरसागर, संगीत दिग्दर्शक अमोल नाईक आदी उपस्थित होते.
टायटल लाँच सोहळ्यानंतर आता ‘युवागिरी’ या नव्या मराठी सिनेमाच्या चित्रकरणाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे.