‘हिंदु राष्ट्रा’ च्या स्थापनेसाठी 2 जूनपासून गोव्यात ‘सप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ अमरावती येथे पत्रकार परिषद संपन्न

0
591
Google search engine
Google search engine

 

हिंदु राष्ट्र स्थापनेची आगामी दिशा निश्चित करण्यासाठी 19 राज्यांतील संघटना एकत्र !

 

अमरावती:-

– हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने 2 ते 12 जून या कालावधीत गोवा येथे सप्तम्अखिल भारतीय हिंदू अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला भारतातील 19 राज्यांसह नेपाळ, श्रीलंका आणि बांगलादेश येथील 150 हून अधिक हिंदु संघटनांचे 650 पेक्षा अधिकप्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.

 

     अधिवेशनात प्रामुख्याने हिंदूंचे संरक्षण, मंदिररक्षण, संस्कृतीरक्षण, इतिहासरक्षण, धर्मांतर, लव्ह जिहाद, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन आदी समस्यांसह युवासंघटन, संतसंघटनआणि हिंदु राष्ट्राची

स्थापना यांंविषयी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम निश्‍चित करण्यात येणार आहेत. त्यासह पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका येथील हिंदूंचे रक्षण अन् त्यांनासाहाय्य करण्यासाठी कोणत्या माध्यमातून प्रयत्न करावेत, याचीही चर्चा होणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी पत्रकारपरिषदेत दिली.

      रामगिरी हॉटेल येथे ठेवण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत  सनातन संस्थेचे प्रसारसेवक पू. अशोक पात्रीकर, समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर, अमरावती जिल्हासमन्वयक श्री. नीलेश टवलारे तसेच  वरिष्ठ महामंत्री अखिल भारतीय क्षत्रिय महासभा चे राजेंद्रसिंह राजपुत, आणि अधिवक्ता आशिष लांडे उपस्थित होते.

       मागील 6 राष्ट्रीय अधिवेशनांत निश्‍चित झाल्यानुसार पाकीस्तान मधून निर्वासीत झालेल्या हिंदूंना भारतीय नागरीकत्व मिळावे, लोकसंख्या नियंत्रण कायदा, झाकीर नाईक च्या ट्रस्टवर बंदी

घालणे, विविध माध्यमातुन होत असलेला देवीदेवतांचा व हिंदू संतांचा अवमान रोखणे यांसारख्या अनेक विषयांवर आंदोलने करण्यात आली, तर अकोला येथे विदर्भस्तरीय अधिवक्ता अधिवेशन सुद्धा घेण्यात आले. याच कार्याला अधिक गती देण्याचा प्रयत्न या सातव्या अधिवेशनाद्वारे होईल.