बहुचर्चीत पंडित पाटणकर हत्या प्रकरणात चार आरोपींची १२ जुनपर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ – पंडित पाटणकर हत्या प्रकरण

0
667

चांदूर रेल्वेः –

     येथील बहुचर्चीत पैशाच्या वादावरून झालेल्या हत्या प्रकरणात अकरा आरोपींवर गुन्हे दाखल झाले होते. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दरम्यान ११ आरोपींपैकी ७ आरोपींना चांदूर रेल्वे न्यायालयाने कंडीशनल जामीनावर सुटका केली असून चार आरोपींना ३० मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत वाढ केली होती. उर्वरीत चौघांना ३० मे ला न्यायालयात हजर केले असता त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १२ जुनपर्यंत पुन्हा वाढ करण्यात आली आहे.

     १४ मार्च रोजी चांदूर रेल्वे येथे मृतक पंडित विक्रम पाटणकर (४५) रा. शिरजगाव ता.मोर्शी व फिर्यादी गौरव सुरेश तिडके (२७) रा.लक्ष्मीनगर, अमरावती यांना जबर मारहाण करण्यात आली होती. यातील पंडित पाटणकर चा उपचारादरम्यान नागपूर येथे १६ मार्चला मृत्यू झाला. मृतक व फिर्यादी हे अमरावती येथे न्यु अविष्कार मल्टिसव्र्हिसेस मार्गदर्शन केंद्र चालवित होते. त्या अंतर्गत ते बँकेचे कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. याच व्यवहारामध्ये चांदूर रेल्वे येथील सिताराम दुबे यांच्या पत्नीने कर्ज काढण्यासाठी दोघांकडे संपर्क करून कागदपत्रे व १५ हजार रूपये दिल्याचे समजते. याच पैशावरूनच वाद होऊन सदर हत्या प्रकरण घडले. या प्रकरणाचा गुन्हा चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनला वर्ग होताच चांदूर रेल्वे पोलीसांनी ९ आरोपींना टप्प्या टप्प्याने अटक करून कोर्टात हजर केले. कोर्टाने या सर्वांना प्रथम पोलीस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. ११ पैकी दोन आरोपी दीड महिण्यापासून फरार होते. त्यातील एक वैभव पांडे ३० एप्रिल रोजी चांदूर रेल्वे पोलीसाला शरण आला, तर दुसरा रितेश बनारसे (रा.अमरावती) याने उच्च न्यायालयातून कंडीशनल अँटीसेप्टीक बेल मिळविली. तर विजय कालकाप्रसाद तिवारी (४०), विजय ललताप्रसाद उपाध्याय (३०) यांना २७ एप्रिल रोजी व  चेतन भांकरलाल रॉय (२८), पवन सुरेशसिंह ठाकुर ( ३२), राजा विष्णुपंत राऊत (२४ ) रा. सर्व चांदूर रेल्वे व राहूल तांडेकर रा.चांदूरवाडी यांनी न्यायालयातून जमानत मिळविली. बुधवारी ३० मे ला न्यायालयीन कोठडी संपल्याने चांदूर रेल्वे पोलीसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम दुबे, वैभव पांडे, मनिष उपाध्याय, सागर गाढवे यांना चांदूर रेल्वे न्यायालय समोर हजर केले. न्यायालयाने या चार आरोपींच्या पोलीस कोठडीत १२ जुनपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली असून त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात केली आहे.