आणखी ४ आरोपींच्या शोधात चांदूर रेल्वे पोलीस – पोलीस हत्या प्रकरण

0
1005
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे – (शहेजाद  खान) 

      राज्यभरात बहुचर्चित ठरलेल्या चांदूर रेल्वे तालुक्सातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला प्रकरणात आणखी ४ आरोपींची नावे वाढली असुन त्यांचा शोध चांदूर रेल्वे पोलीस घेत आहे.

       चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड कसबा येथील बंजारा तांड्यावर  एका शेतशिवारातील गावठी दारू अड्डा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शामराव कवडुजी जाधव (५५) व शिपाई सतीश शरद मडावी (४१) यांनी उद्ध्वस्त केला. उद्ध्वस्त केल्यानंतर जाधव यांच्या अॅवेंजर दुचाकीने पोलीस स्टेशनकडे परत जाण्यासाठी निघाले असता त्याच ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये सतिष मडावी यांचा जागीच मृत्यु झाला असुन जाधव गंभीररित्या जखमी झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत मुख्य आरोपी उमेश शालिकराम राठोड (३०) व अजय उर्फ राजा सकरू राठोड (२०) यांना अटक केली असुन त्यांच्यावर कलम ३०२,३०७,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना ५ जुनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर आरोपींना लपविण्यास व पळविण्यास मदत करणारे विष्णु रतनसिंग चव्हाण (३०), राजु वासुदेव राठोड (३५), बाला लक्षीराम जाधव (३५), दिनेश शालिकराम राठोड (३५) व सकरू लक्षीराम राठोड (४०) यांच्यावर कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल केला असुन त्यांना ही अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत असतांना आरोपींकडुन अजुन सोबत असलेल्या चार आरोपींची नावे सांगितल्याची माहिती मिळाली आहे. सदर आरोपींची नावे पोलीसांनी गुप्त ठेवली असुन त्यांचा शोध घेणे सुरू आहे. चार आरोपींमध्ये एक दिलीप शालिकराम राठोड (४५) रा. मांजरखेड तांडा याचाही समावेश असुन त्याच्यावर वन्यजीव संरक्षण कायदा कलम अन्वये तसेच मांजरखेड येथील सरपंचाला जिवे मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल आहे. लवकरच आरोपींना अटक होणार असल्याची माहिती ठाणेदार शेळके यांनी दिली. या प्रकरणात हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड व कपडे रक्तात माखलेल्या अवस्थेत जप्त करण्यात आले. तसेच मृतक पोलीस कर्मचारी सतिष मडावी याचा आरोपींनी विहीरीत फेकलेला मोबाईलसुध्दा पोलीसांनी बाहेर काढला आहे. सदर प्रकरणात अजुन खोल तपास चांदूर रेल्वे पोलीस करीत आहे.