देहलीच्या जामा मशिदीमध्ये कधी दिवाळी, दसरा, रामनवमी आदी हिंदूंचे सण साजरे झाले आहेत का ? – लक्ष्मणपुरी येथील प्राचीन मनकामेश्‍वर मंदिरामध्ये इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन

0
896
Google search engine
Google search engine

 

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील सर्वांत प्राचीन शिवमंदिर असणार्‍या मनकामेश्‍वर मंदिरामध्ये पहिल्यांदाच इफ्तारच्या मेजवानीचे आयोजन १० जून या दिवशी करण्यात आले आहे. गोमती नदीच्या किनार्‍यावर असणार्‍या या मंदिराच्या उपवन घाटावर ही मेजवानी होणार आहे. या घाटावर प्रतिदिन महिला पुजारी महंत देव्यागिरी यांच्याकडून गोमती नदीची आरती करण्यात येते.

महंत देव्यागिरी यांनी इफ्तारविषयी सांगितले की, मेजवानीला येणार्‍यांना विविध प्रकारचे व्यंजन खाऊ घालण्यात येणार आहेत. आम्ही शिया आणि सुन्नी दोन्ही समुदायाच्या लोकांना आमंत्रित केले आहे. आम्हाला आशा आहे की, ही मेजवानी ऐतिहासिक ठरेल.

यापूर्वी ४ जून या दिवशी अयोध्येतील रामजन्मभूमीच्या शेजारी असणार्‍या ५०० वर्षे जुन्या शरयू कुंज मंदिरामध्ये इफ्तारचे आयोजन करण्यात आले होते.