रेती माफिया आणि गौण खनिज वाहतूक करणारे यांचे ‘अच्छे दिन’

0
589
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार तालुक्यात अवैध रेती तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू,
पोलिसांच्या धडक कार्यवाही,महसूल प्रशासन ची डोळे झाक
लहानसहान कार्यवाही वर महसुल प्रशासन खुश,तर गब्बर वर कार्यवाही नाही

चांदुर बाजार:

चांदुर बाजार तालुक्यात येणाऱ्या चांदुर बाजार पोलीस स्टेशन,ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशन,शिरजगाव कसबा पोलीस स्टेशन ,आसेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार आणि कर्मचारी हे अवैध रेती आणि अवैध तसेच ओहोरलोड गौण खनिज करणाऱ्या वर कार्यवाही चे सत्र सुरू आहे तर महसूल प्रशासन लहान सहान कार्यवाही वर खुश असल्याचे चित्र चांदुर बाजार तालुक्यात आहे. त्यामुळे अवैध गौण खनिज तस्कर टिपर आणि अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक्टर हे सैराट वेगाने रोडने पाठविताना दिसतात.

ट्रिपर ने मोठ्या प्रमाणात रोडवरून ओहोरलोड गौण खनिज ची वाहतूक होत आहे.त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेले रोड हे लवकरच कालबाह्य होणार असल्याचे दिसून येत आहे.अवैध रेती तस्कर हे आता दिवस रात्र रेतीची तसेच गौण खनिज ची वाहतूक करीत आहे.स्थानिक पातळीवर महसूल चा शेवटचा महत्त्व पूर्ण कणा समजला जाणारा तलाठी कोतवाल याची चक्क या रेती माफिया आणि गौज खजि न वाहतूक करणाऱ्या कार्यवाही न होत असल्याने त्यांना याचा पाठींबा असल्याचे दिसून येत आहे.

तालुक्यात पूर्णा नदी,मेघा नदी या नद्यांच्या संगम अशा बराच मोठा नद्यांचा वेढा आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेती आहे तर मध्य प्रदेश च्या काठावरून मोठ्या प्रमाणात मुरूम ची वाहतूक तालुक्यातील गब्बर करीत आहे.मात्र त्यांच्यावर कार्यवाही हे फक्त देखाव्यासाठी करण्यात येत असल्याचे दिसत आहे.अशी चर्चा तालुक्यात चांगलीच रंगली आहे.

*बॉक्समध्ये*
*चांदुर बाजार तहसील कार्यालय मधील अनेक कर्मचारी हे रेती तस्कर आणि मुरूम वाहतूक करणाऱ्या टिपर मालकाच्या संपर्कात असल्याचे दिसून येते.मात्र यांच्या नियंत्रण ठेवणार तरी कोण?सुट्टीच्या दिवशी ही रेती वाहतूक सुरू आहे त्यामुळे बाहेर दुसरे आणि आत दुसरे अशी चर्चा तालुक्यात रंगात आहे.*