चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच घोषीत करण्यात आला. यामधील प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार विरेंद्र जगताप यांनी घरी जाऊन पालकांसह सत्कार केला.
चांदूर रेल्वे शहरातील निधी अनिल बागमार, सृष्टी राजेंद्र वऱ्हाडे, अनुश्री रवींद्र मालखेडे, सदफ राणा इसराईल खान, अंजली अनिल सरदार या विद्यार्थ्यांनी दहावीच्या निकालात बाजी मारून चांदूर रेल्वे शहराचे नाव जिल्हास्तरावर नावलौकीक केले. त्यामुळे चांदूर रेल्वे – धामणगांव मतदार संघाचे आमदार प्रा. विरेंद्र जगताप यांनी शहरातील या गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा व त्यांच्या पालकांचा गुणगौरव केला. तसेच पुढील उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टू सूर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकरराव वाघ, जगदीश आरेकर, न.प. उपाध्यक्ष देवानंद खुणे, अनिस सौदागर, रुपेश पूडके, सुमेर सरदार आदींची उपस्थिती होती.