घुईखेडच्या सरपंचपदी विनय गोटफोडे

0
664
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान ) 
       चांदूर रेल्वे तालुक्यातील घुईखेड गावच्या सरपंचपदी विनय ज्ञानेश्वरराव गोटफोडे यांची अविरोध निवड सोमवारी करण्यात आली.
        चांदूर रेल्वेवरून १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या घुईखेडचे सरपंच प्रेमदास मेश्राम यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्याने पुढच्या अडीच वर्षासाठी सरपंचाची पुन्हा निवडणुक सोमवारी घेण्यात आली. ग्रामपंचायतमध्ये ११ सदस्यांपैकी ९ सदस्य कॉंग्रेसचे असुन २ सदस्य विरोधी पक्षाचे आहेत. सोमवारी कॉंग्रेसचे विनय गोटफोडे यांचा एकमेवच अर्ज दाखल झाल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर बोलतांना विनय गोटफोटे यांनी सर्वांचे आभार मानत गावाच्या विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल माजी जि. प. सदस्य प्रविण घुईखेडकर, जि.प.सदस्या सौ. राधिकाताई घुईखेडकर, शेख अंबीरभाई, लखपती मेश्राम, जनार्धन शेंडे, किशोर क्षिरसागर, कैलास सावनकर, वामनराव क्षिरसागर, रामकृष्ण पवार, मनोहरराव कोल्हे, सुरेश काकडे यांसह अनेकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे.