शिवानी कोरडे मन्नालाल गुप्ता विद्यालयातुन प्रथम

0
1227
Google search engine
Google search engine

 

चांदूर रेल्वे – (शहेजाद खान )

दहावीच्या परिक्षेचा निकाल नुकताच घोषीत झाला. यामध्ये शहरातील श्री. मन्नालाल गुप्ता विद्यालयाची विद्यार्थीनी शिवानी नरेश कोरडे हिने ९४.६० टक्के गुण प्राप्त करीत शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळविला. कठोर मेहनत, परिश्रम करून तिने सदर यश संपादित केले आहे. शिवानी कोरडे ही मुळची तालुक्यातील शिरजगाव (कोरडे) येथील रहिवासी असून सद्या शहरातील पात्रीकर कॉलनी येथे वास्तव्यास आहे.
ती आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. मोरे, वर्गशिक्षक गणगणे तसेच शिक्षक कडू, अंबुलकर, गणगणे मॅडम, देशमुख मॅडम, वडील नरेश कोरडे, आई सौ. स्वाती कोरडे यांना देते. तिच्या यशाबद्दल सरपंच संजय देशमुख, लताताई देशमुख, अनिल आंबेकर, दामोधर काळबांडे, प्रदिप भालकर, अरूणराव शेळके, मनिष पनपालीया आदींनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.