हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

0
914

 

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या नाशिक येथील सभेला हिंदुद्वेष्ट्यांकडून विरोध !

नाशिक – हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असून हिंदु धर्म, संस्कृती आणि त्याचे अनुयायी हे सर्वोत्कृष्ट आहेत. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी लढा उभारला अन् गुलामगिरीतून हिंदुत्वाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा या देवतेचे कर्तृत्व समाज विसरत चालला आहे. शासनकर्ते आणि समाज यांनाही शिवरायांविषयीचा मान-सन्मान, आदर-अभिमान यांचा विसर पडला आहे. शिवरायांच्या भूमीतील पिढी उच्चशिक्षण, अमाप पैशाच्या आमिषापोटी विदेशी भूमीत जाऊन चाकरी करते, अशी खंत पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी व्यक्त केली. नाशिक येथील कारंजा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सभेत १० जून या दिवशी ते बोलत होते.

रायगड किल्ल्यावरील ३२ मण सुवर्णसिंहासनाची पुनर्स्थापना आणि खडापहारा तुकडी निर्मितीच्या प्रसारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. नेहमीप्रमाणेच या वेळी सभास्थळाच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता, त्यामुळे त्या परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.