घुईखेड ते पंढरपुर पायदळ वारीचे प्रस्थान – संत बेंडोजी बाबा पालखीची १२९ वर्षांची परंपरा

0
1338
Google search engine
Google search engine

२७ जुलै  ला पंढरपुरला पोहोचणार

चांदुर रेल्वे – (शहेजाद खान)


आषाढी वारी ही एक मोठी वारी आहे. आषाढी पौर्णिमा पायदळ वारीेचे आयोजन  तालुक्यातील घुईखेड येथील श्री. बेंडोजी बाबा संस्थानतर्फे करण्यात आले असुन ही वारी चालत, वाजत, गाजत, भजन, कीर्तन, भारूड करत ऊन-वारा-पाऊस अंगावर फुले झेलल्यासारखी झेलत पंढरीसाठी शेकडो भावीकासह ११ जुन सोमवारला रवाना झाली आहे. ही दिंडी २७ जुलै ला पंढरपुर येथे पोहोचणार आहे.


यामध्ये सर्वप्रथम श्री. बेंडोजी महाराज यांच्या पादुकांचे जलाभिषेक मंदिराचे ट्रस्टी दिनकरराव घुईखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांचीही उपस्थिती होती. त्यानंतर नित्य- नियमानुसार गावातील चंद्रभागा नदीकडे दिंडी प्रस्थान करीता मार्गास्त झाले. लाखो भावीकांचे श्रध्दास्थान असलेले श्री. संत बेंडोजी महाराज (संजीवनी समाधी) यांच्या ४७ दिवसाच्या पायी दिंडी सोहळ्याकरीता तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे एएसआय राठोड उपस्थित होते. या वारीमध्ये घुईखेडसह आजुबाजुच्या गावांतील भाविक घरदार, संसार, सुख-दु:ख, दुखणे, आजारपण सर्व विसरून सामील झाले. शेकडो वारकरी कोणाच्याही पत्राची, आमंत्रणाची वाट न पाहता सर्व कामे बाजूला ठेवून किंवा पूर्ण करून वारीला निघण्यास तयार झाले होते. कशाचीही काळजी, चिंता न बाळगता सर्व त्या माउलीवर सोपवून आषाढ महिन्यात तयार होऊन निघाले. भाविक घुईखेड येथुन प्रस्थानापासून ते पंढरीपर्यंत चालत सतत त्या माउलीचे नाव घेत भजन, कीर्तन करत वारीत सामील झाले. अगदी मोकळ हवेतून चालत, घाटातून चालत, मोकळ रानातून, दाट झाडीतून, मजल दरमजल करत भाविक निघाले. निसर्गाचा पुरेपूर आनंद  वारीत सतत घेतात. नवीन माणसे, नवीन ओळखी, नव कला अनुभवाला मिळतात. भाविकांच्या संपूर्ण शरीराची या वारीमुळे सर्व्हिसिंग होते.


श्री. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील श्री. ज्ञानेश्वर माऊली रथामागील एकुन २१ मानाच्या दिंड्यापैकी मानाची दिंडी म्हणुन श्री. संत बेंडोजी महाराज संस्थान, घुईखेडच्या दिंडीचा १७ वा क्रमांक आहे. व या रथामागे विदर्भ प्रांतातुन जाणारी घुईखेड येथील एकमेव दिंडी आहे. श्री. संत बेंडोजी महाराज संस्थान हे १३३७ चे असुन सदर वास्तु ही अतिशय प्राचीन असल्याचा इतिहास दर्शवितो. या पायी दिंडी सोहळ्याची वारकरी संप्रदायाची परंपरा ही एकुन १२९  वर्षापासुन चालत आलेली आहे. तसेच २१ व्या शतकामध्येही पायी दिंडी सोहळ्याची प्रथा आजही अविरतपणे यशस्वापणे पार पडत आहे. ४७ दिवशीय पायदळ वारीमध्ये ह.भ.प. निवृत्तीनाथ गोळे महाराज, ह.भ.प. गावंडे महाराज, ह.भ.प. खुशाल गोडबोले, ह.भ.प. सतिष भुंबर, सौ. निर्मलाबाई हेले, बबनराव कोठाडे, डॉ. धोटे, मधुकरराव चोपदार, संजीवराव भोरे यांसह  वारकरी भजन मंडळीमध्ये विश्वेश्वरराव गावंडे, पांडुरंग भोयर, तुळशिराम वैदिय, काशिनाथ लाड, यादवराव येवले, विठ्ठलराव चौधरी, जयकृष्ण येवले, प्रफुल चनेकार, कुणाल सिंगलवार, प्रफुल घड्डीनकर, अनिल शेंडे, दादाराव क्षिरसागर, गोपाल मोकाशे, दादाराव कुडे तसेच संस्थानचे ट्रस्टी बाळासाहेब देशमुख, प्रविण घुईखेडकरसह हजारो भाविक भक्त सहभागी झाले आहे.