हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या जागृतीसाठी देशभरात 297 ठिकाणी सभा, 965 ठिकाणी ‘ग्राम बैठका’ घेणार !

0
718
Google search engine
Google search engine

रामनाथी (गोवा) – सप्तम ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’अंतर्गत ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशन’ येथील श्री रामनाथ देवस्थानमधील श्री विद्याधिराज सभागृह येथे ते12 जून या कालावधीत पार पडलेया अधिवेशनामध्ये उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्रस्थापनेविषयी समाजात जागृती करण्यासाठी हिंदु राष्ट्रजागृतीचे उपक्रम देशभर राबवण्याचा निर्धार केलात्या अंतर्गत देशभरामध्ये छोट्यामध्यम आणि मोठ्या हिंदु धर्मजागृती सभातसेच ‘एक वक्ता सभा’ अशा एकूण 297 ठिकाणी ‘हिंदु धर्मजागृती सभा’ घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.याचसमवेत 965 ठिकाणी ‘ग्रामस्तरीय हिंदु राष्ट्रजागृती बैठकां’चे आयोजन, 209 ठिकाणी शौर्य जागरण शिबिरे घेण्याचे निश्‍चित करण्यात आले.या अधिवेशनाला देशातील 13 राज्यांतून 240 हून अधिक हिंदुत्वनिष्ठतसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

         या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.)चारुदत्त पिंगळेसनातनचे उत्तर महाराष्ट्र धर्मप्रसारक सद्गुरु नंदकुमार जाधवसद्गुरु (सौ.)बिंदा सिंगबाळसनातनच्या मुंबईठाणेरायगड आणि गुजरात राज्य धर्मप्रसारक सद्गुरु (कु.)अनुराधा वाडेकरपश्‍चिम महाराष्ट्र धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये आदींसह अन्य वक्त्यांनी धर्मप्रेमींना राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात व साधनेविषयी मार्गदर्शन केलेया वेळी हिंदुत्वनिष्ठांना ‘चांगले संघटक निर्माण करणे’, ‘धर्मबंधूभाव निर्माण करणे’, ‘हिंदूंमध्ये जागृती करणे’, ‘हिंदूंना संघटित करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे’यांविषयी प्रशिक्षण देण्यात आले.

 हिंदु राष्ट्रस्थापनेच्या कार्याचा दृढ निश्‍चय करून मार्गक्रमण करूया ! – सद्गुरु (डॉ.)चारुदत्त पिंगळे

समाजात हिंदु राष्ट्रसंघटक म्हणून कार्य करतांना हिंदु राष्ट्र संकल्पनेच्या दृष्टीने अभ्यास असणे आवश्यक आहेत्यासाठी वैचारिकबौद्धिक,आध्यात्मिक आणि शारीरिक स्तरांवर कार्य करायला हवेहिंदु राष्ट्रस्थापनेच्या संदर्भात जागृती आणि हिंदूसंघटन करत असतांना काळाची पाऊले ओळखून त्याप्रमाणे संविधानिक मार्गाने कार्य करायला हवेहे ऐतिहासिक कार्य करण्याचा दृढ निश्‍चय करून त्या दिशेने मार्गक्रमण करूयाअसे मार्गदर्शन सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले.

हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण अधिवेशना’त निश्‍चित केलेला समान कृती कार्यक्रम !

1. प्रतिमास 85 नवीन ठिकाणी ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात येणार !

2. धर्मप्रेमी युवकांना धर्मशिक्षण मिळण्यासाठी270 नवीन ठिकाणी साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गांचे आयोजन !

3. एकूण 69 ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र संघटक प्रशिक्षण कार्यशाळा’ घेण्याचे निश्‍चित !

4. हिंदु राष्ट्राविषयी पत्रकार आणि प्रबुद्ध नागरिक यांच्या परिसंवादांचे 84 ठिकाणी आयोजन करण्यात येेणार !

5. धर्मशिक्षणकाश्मिरी हिंदूंवर झालेले अत्याचार आदींसह विविध विषयांवर 577 ठिकाणी फ्लेक्स प्रदर्शनांचे आयोजन !

6. 38 ठिकाणी वक्ता प्रशिक्षण कार्यशाळा, 89ठिकाणी सोशल मीडिया शिबिरे, 60 ठिकाणी साधना शिबिरे घेण्याचे निश्‍चित !