रुग्णांची हेळसांड करणाऱ्या डॉ.जपसरे प्रकरणातील मृतकाच्या प्रेताचे उत्खनन करुन जागेवरच शव विच्छेदन

0
781
Google search engine
Google search engine

आकोटः (प्रतीनिधी)

अकोट शहरातील मनोज प्रभूदास तेलगोटे ह्याचा शहरातील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉक्टर कैलास जपसरे ह्यांच्या रुग्णालयात उपचारा दरम्यान 22 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता.डॉक्टर जपसरे ह्यांनी चुकीचा उपचार केल्याने त्याचा मृत्यू झाला व तो मरण पावल्या नंतर ही त्याला अकोला येथे खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचारा साठी पाठवून त्याच्या प्रेताची अवहेलना केली अश्या आशयाची तक्रार पोलिस स्टेशन अकोट शहर येथे करण्यात आली होती.ह्या संबधी तक्रार प्राप्त झाल्यानंतर अकोट शहर पोलिसांनी सखोल तपासा अंती १५ मे २०१८ ला डॉ. कैलास जपसरे ह्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून डॉ. जपसरे ह्यांना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली होती.तपासाचा भाग म्हणून मृतक मनोज तेलगोटे ह्याच्या मृत शरीराचे शवविच्छेदन होणे आवश्यक होते .त्यासाठी पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत ह्यांची लेखी परवानगी प्राप्त करून शव विच्छेदन करण्या साठी न्यायवैद्यनिक तज्ज्ञांची आवश्यकता असल्याने वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालय अकोला चे डीन कार्यकर्ते ह्यांच्या आदेशाने आज दि.१३ जुन रोजी डॉ.गाडगे , डॉ साबळे व त्यांचे टीम ने अकोट शहरालगतच्या ख्रिश्चन दफन भूमी मध्ये दफन करण्यात आलेल्या मृतक मनोज तेलगोटे च्या प्रेताचे उत्खनन करून जागेवरच शवविच्छेदन केले. यानंतर प्रेत परत विधिवत दफन करण्यात आले .ह्या वेळी पोलिस निरीक्षक गजानन शेळके, नायब तहसीलदार राजेश गुरव, तपास अधिकारी शिंदे, तथा मृतकाचे नातेवाईक उपस्थित होते, शवविच्छेदन अहवाला वरुन मृतकच्या मृत्यूचे निश्चित कारण समजण्यास मदत होणार आहे, अकोट शहरातील वैद्यकीय क्षेत्र ढवळुन काढणाऱ्या ह्या संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्याचे मार्गदर्शनाखाली तपास अधीकारी अकोट शहर पोलीस करीत आहेत।