एसएफआय च्या वतीने तहसीलदारांना निवेदन

0
762
Google search engine
Google search engine

तहसिल कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र तात्काळ चालू करा.

प्रतिनिधी:- दिपक गित्ते

माजलगाव:-(१३) माजलगाव तालुक्यातील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र मागील काही दिवसा पासून बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी यांचे धावपळ होत आहे. सध्या शैक्षणिक वर्षे 2018-19 वर्षे चालू आहे, त्यामुळे आज दि:13 रोजी स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया(एसएफआय) माजलगांव तालुका कमिटीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले येत्या दोन दिवसात सेतू सुविधा केंद्र चालू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ‘एसएफआय’ चे जिल्हासचिव रुपेश चव्हाण, रामेश्वर जाधव, संतोष जाधव, रवी राठोड, सम्राट डोंगरे, रोहीत भागवत, नितीन राठोड, सुनिल राठोड व आदी कर्याकर्त उपस्थित होते.