चांदुर बाजार खरेदी विक्री प्रकरण

0
724
Google search engine
Google search engine

खरेदी विक्री तूर नोंदणी ऑफलाइन रजिस्टर प्रकरण,खापरे फोडले व्यवस्थापक यांच्या वर,कार्यवाही फक्त नावाला

शेतकरी यांची झालेली नुकसान भरपाई कोण देणार,?

चांदुर बाजार :-

शासन नाफेड तूर आणि हरभरा खरेदी ची जबाबदारी ही खरेदी विक्री संस्था कडे दिली.त्या करीत ऑनलाइन नोंदणी करण्याचे महत्वाचे असल्याचे सुरुवातीला शेतकरी यांची चांगली तारांबळ उडाली.तूर आणि हरभरा नोंदणी सुरू झाली.या सर्व सुरू असताना चांदुर बाजार येथील खरेदी विक्री मध्ये वेगळाच प्रकार समोर आला.या ठिकाणी आलेल्या शेतकरी यांच्या तूर नोंदणी करीता ऑफलाईन रजिस्टर नोंदविण्यात आले होते.मात्र जेव्हा नोंदणी होऊनही शेतकरी यांचा नंबर लागल्याने त्यांनी खरेदी विक्री मधील नाफेड नोंदणी केंद्रावर खरेदी विक्री मार्फत ठेवण्यात आलेल्या रोजदारी कर्मचारी याने शेतकरी याना माहितीचा अधिकार सांगितल्याने प्रकरण आणखीच पेटले आणि शेतकरी यांचा रोष वाढत गेला.

या प्रकरणात सुरुवातीपासून घोळ असल्याचे दिसून आले.सेवानिवृत्ती झालेले व्यवस्थापक याना अतिरिक्त पदभार सहा महिन्या करिता देण्यात होता.तसेच पाहिले रजिस्टर दिसत नाही मग असे रजिस्टर नाही ,मग रजिस्टर आहे पण रोजदारी कर्मचारी यांच्या कडे आहे .असे वाक्य समोर आले.मात्र या संबंधी खरेदी विक्री याना हा निर्णय योग्य नसून व्यवस्थापक याना पदावरून पदमुक्त करण्याचे आदेश सहायक निबंधक चांदुर बाजार यांनी दिली.तर खरेदी विक्री अध्यक्ष यांनी रोजगार कर्मचारी याला कामावरून काडून टाकले.मात्र शेतकरी यांची झालेली नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न आता तालुक्यातील शेतकरी वर्गासमोर आहे.

या सर्व प्रकरणात खरेदी विक्री मधील संचालक यांनी आपल्या जवळील शेतकरी यांच्या तुरीच्या नोंदणी आणि खरेदी ला प्रथम प्राधान्य दिले असल्याचे बोलले जात आहे.तर काही प्रकरणात 8 फ्रेबुवारी ला झालेल्या तूर नोंदणी चा क्रमांक 3000 वर तर मार्च महिन्यातील नोंदणी क्रमांक 2500 आला असल्याने एकमहिन्याच्या फरक असल्याने नोंदणी क्रमांक पहिल्याचा मागे आणि मागच्या त्याचा पहिला आला असल्याचे चित्र आहे.त्यामुळे खरेदी विक्री मधील संचालक शुद्ध या मध्ये असल्याचे बोलले जात आहे.याच्या चौकशी मागणी होत आहे.

एकीकडे शेतकरी यांच्या नाफेड मधील तुरीच्या खरेदी चे पैसे उशिरा मिळत असल्याने कॉग्रेसचे आत्मदहन होत आहे तर दुसरीकडे सत्ता असलेल्या ठिकाणी हा सर्व प्रकार झाल्याने त्यामुळे आत काय आणि बाहेर काय?अशी चर्चा आता रंगली आहे.त्यामुळे संचालक यांच्या बचावण्यासाठी फक्त नावाला कार्यवाही केली दाखवून प्रकरण दडपन्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.तर रोजदारी कर्मचारी इतका मोठा घोळ एकटा कसा करू शकतो. ?याला बाजार समिती मधील संचालक यांचा पाठबळ असल्याचे दिसत आहे.अशी चर्चा तालुक्यातील शेतकरी वर्ग यांच्या मध्ये रंगली आहे.