मोर्शीत २५०० महिलांच्या उपस्थितीत वार्षिक सभा व महिला मेळावा संपन्न ●<>● महिला बचत गटाची उत्पादने सर्वसामान्यांना परवडणारी – आ.डॉ.अनिल बोंडे

0
1430

मोर्शी : महिला बचतगटांना आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण करण्याबरोबरच त्यांना रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जागतिक दर्जा लाभलेली तसेच शरीरावर कुठलाही परिणाम न होणारी मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटूंबासह अगदी सर्वांनाच परवडतील अशीगृहउपयोगी व स्वस्त दरातील सौंदर्य प्रसाधनाच्या उत्पादनाची निर्मिती करण्यात आली, असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगाने महिला बचत गटांच्या माध्यमातून ही उत्पादने गावा-गावात विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली आहेत, त्यामुळे या अभिनव संधीचा मतदार संघातील महिला बचतगटांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मोर्शीत आयोजित केलेल्या महिला बचत गट मेळाव्याच्या व्यासपीठावरून मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडेयांनी बोलतांना व्यक्त केले. या मेळाव्याला तालुक्यातून २५०० पेक्षा अधिक महिला उपस्थित असल्याने संपूर्ण सभागृह भरगच्च भरून गेले होते.

मातोश्री त्रिवेणी बोंडे महिला सूतगिरणी, झेप लोकसंचालीत साधन केंद्र व माहेर लोकसंचालीत साधन केंद्र लेहगाव, तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ यांचे संयुक्त विद्यमाने सौंदर्य व गृहउपयोगी उत्पादनांचा शुभारंभ आणितालुक्यातील बचतगटांचा मेळावा तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा ८ जून २०१८ रोजी स्थानिक साबू मंगल कार्यालयातआयोजित करण्यात आली होती. २५०० पेक्षा अधिक महिलांच्या उपस्थितीमध्ये हि सभा पार पडली, सभेचे उद्घाटन आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते पार पडले, या आयोजित मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.वसुधा बोंडे होत्या तर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणूने महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावतीचे जिल्हा समन्वय अधिकारी खुशाल राठोड, पुण्याच्या मास्टर ट्रेनर स्मिता कुलकर्णी, केम प्रकल्पाचे ऋषिकेश घ्यार, संजय इंगळे, सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (जिल्हा अग्रणी बँकेचे) शाखा प्रमुख जितेंद्रकुमार झा साहेब, मोर्शीच्या नगरध्यक्षा शीला रोडे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चचेरे, मोर्शी पंचायत समितीचे सभापती शंकर उईके, माविमचे केशव पवार, भाजपचे शहराध्यक्ष दीपक नेवारे, आत्मा तालुकाध्यक्ष देवकुमार बुरंगे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष राहुल चौधरी, निलेश चौधरी, झेप व माहेर लोकसंचालीत केंद्राच्या शारदा सातींगे यांच्यासह अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

महिला आर्थिक विकास महामंडळ अमरावतीचे जिल्हा समन्वय अधिकारी खुशाल राठोड हे प्रास्ताविक करतांना म्हणाले कि, आ.डॉ.अनिल बोंडे हे राजकारणी असले तरी ते एक डॉक्टर आहेत, त्यांना याची जाणीव आहे कि कुठल्या रोगावर कुठल औषध द्यावं लागत, त्यामुळ आमदार डॉ.अनिल बोंडे हे नेहमीच महिला बचत गट आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच त्यांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्नशील असतात. आज सुद्धा महिला मेळाव्यात त्यांनी उपस्थिती देऊन आपल्या भाषणातून बचत गटातील महिलांची स्तुती करीत जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला असे हि राठोड यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाच्या सुरवातीलाच सर्वसाधारण वार्षिक सभेचे वाचन करण्यात होते. त्याचबरोबर यशस्वीतेचा शिखर गाठलेल्या बचत गटातील महिलांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी झेप व माहेर लोकसंचालीत साधन केंद्राच्या संपूर्ण पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या सहभाग घेतला होता.