अकोट शहर पोलिस व मुस्लिम युथ असोसिएशन कडुन इफ्तार पार्टी

0
812

आकोटः संतोष विणके –

रमजान महिन्यातील रोजा च्या अनुषंगाने शहरातील मदिना हॉल येथे पोलिस स्टेशन अकोट शहर व मुस्लिम युथ असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुवारला इफ्तार पार्टी व शांतता समिती सभेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश कला सागर, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, तहसीलदार विश्वनाथ घुगे, नगराध्यक्ष हरीनारायण माकोडे ,पोलिस निरीक्षक गजानन शेळके ,आकोट ग्रामिणचे ठाणेदार मिलिंद बहाकार हे प्रामुख्याने उपस्थित होते, ह्या वेळी पोलिस निरीक्षक गजानन शेळके, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, पोलिस अधीक्षक राकेश कला सागर , बदरू जमा ह्यांनी शांतता समीती सभेस समयोचित मार्गदर्शन केले.सभेच्या शेवटी मुस्लीम बांधवांनी ईफ्तारद्वारा रोजा सोडला.सभेला सर्व पक्षिय मान्यवरांसह शांतता समीती सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थीती होती.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्यात.यावेळी मोठ्या संखेने हींदु बांधवांचीही कार्यक्रमाला उपस्थीती होती.